Crop Diversification: बदलत्या जागतिक परिस्थितीत स्पर्धात्मक व व्यावसायिक शेतीचा अवलंब केल्याशिवाय शेती व्यवसाय शाश्वत होऊ शकत नाही. विशेषतः विदर्भ व मराठवाड्यात अपारंपरिक पिकांची लागवड वाढवणे ही काळाची गरज, असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले..डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘मसाला व सुगंधी वनस्पती पिकांचे शाश्वत उत्पादन व प्रक्रियेसाठी अद्ययावत तंत्रज्ञान’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय शेतकरी चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी शेतकऱ्यांनी किमान २० टक्के क्षेत्रावर नगदी व अपारंपरिक पिकांची लागवड करावी, तसेच प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या प्रक्षेत्र भेटी घ्याव्यात, असे आवाहन केले..Farm Pre-Cultivation: शेतांची पूर्वमशागत सुरू.यावेळी शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी सांगितले की, राज्यात मसाला पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात सातत्याने वाढ होत असून हळद, आले, धने, ओवा, मेथी, मिरची तसेच सुगंधी वनस्पतींच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. भाजीपालाशास्त्र विभाग, उद्यानविद्या शाखा यांच्या वतीने एकात्मिक उद्यान पिके विकास अभियानांतर्गत हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून सुपारी व मसाला पिके संचालनालय कालिकत (केरळ) यांचे यासाठी अर्थसाहाय्य लाभले आहे..Modern Farming: योजनांचा लाभ घ्या, शेती आधुनिक करा.चर्चासत्रात अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान, पीक संरक्षण, मूल्यवर्धन व प्रक्रिया, तसेच विपणन व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय प्रक्षेत्र भेटीद्वारे प्रत्यक्ष तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली..कार्यक्रमास अधिष्ठाता (कृषी) डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता (उद्यानविद्या) डॉ. अरविंद सोनकांबळे, फळशास्त्र विभागप्रमुख डॉ. शशांक भराड, महिला उद्योजक शोभा गायधणे व्यासपिठावर तर भाजीपाला शास्त्र विभागाचे प्रा. डाॅ. विजय काळे, डाॅ. अभय वाघ, केव्हीकेचे गजानन तुपकर, निवृत्ती पाटील, कृषी विभागाचे विजय शेगोकार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शास्त्रज्ञ व राज्यभरातील शेतकरी उपस्थित होते..कार्यक्रमाची सुरुवात पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक डॉ. अरविंद सोनकांबळे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. किशोर बिडवे यांनी तर आभार डॉ. विजय काळे यांनी मानले. दरम्यान, कार्यक्रमाच्या निमित्ताने मसाला पिकांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. यातील सहभागी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.