Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Sadabhau Khot : सरकार कोणतेही असूद्या शेतकऱ्यांची लूटच : खोत

Vari Shetkaryanchi : गेल्या काही दिवसांत सामान्य जनतेचा आवाज कुठेही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदना सरकारच्या वेशीवर टांगण्याचे काम ‘वारी शेतकऱ्यांची’ या पदयात्रेच्या माध्यमातून करणार आहोत.

Satara News : राज्यात कुठलंही सरकार सत्तेत आलं तरी शेतकऱ्यांची लूट थांबत नाही. त्यामुळे सत्ताकारणात गुरफटलेल्या राजकारण्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने २२ मे रोजी कऱ्हाड ते सातारा दरम्यान ‘वारी शेतकऱ्यांची’ ही पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे (Rayat Kranti Sanghtana) अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पदयात्रेदरम्यान सरकारने चर्चेस न बोलविल्यास सातारवरून थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.

खोत म्हणाले, की गेल्या काही दिवसांत सामान्य जनतेचा आवाज कुठेही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदना सरकारच्या वेशीवर टांगण्याचे काम ‘वारी शेतकऱ्यांची’ या पदयात्रेच्या माध्यमातून करणार आहोत.

महाराष्ट्रामध्ये प्रती टन उसाला तीन हजार रुपये भाव मिळत असताना गुजरात राज्यात साडेचार हजार मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळण्यासाठी गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात लागू करावा.

Indian Agriculture
Sadabhau Khot : शेतकऱ्याला तब्बल ४० हजारांचा दंड, टेम्पोही केला जप्त ; सदाभाऊ खोत यांचं पालिकेसमोरच कांदे विकत आंदोलन

तसेच सहकारी साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा होण्यासाठी दोन कारखान्यांमधील २५ किलोमीटरचे हवाई अंतर कमी करावे. मूठभर लोकांच्या हितासाठी अस्तित्वात असलेला जमीन तुकडाबंदी कायदा रद्द करावा.

बारसू रिफायनरी प्रकल्प शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर उभा राहताना अनेकदा शेतकऱ्याला पैसे देऊन गप्प बसविले जाते. मात्र, आता बारसू प्रकल्पात शेतकऱ्याच्या जमिनी जात असतील तर त्याला कंपनीत भागधारक बनवावेत. त्यामुळे नफ्यातील रक्कम दर महिन्याला शेतकऱ्याच्या कुटुंबाला मिळेल.

शेतकऱ्यांच्या या प्रश्‍नांच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्यासाठी कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळाला अभिवादन करून यात्रा तीन दिवसांच्या मुक्कामानंतर साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करणार.

सचिन नलावडे, आनंद जाधव, समाधान पोफळे, प्रकाश साबळे, संजय शेलार, मधुकर जाधव उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com