MP Nilesh Lanke Protest: शासनाकडून वीजेचे स्मार्ट मीटर बसवण्याला लोकांतून विरोध होत आहे. आता खासदार नीलेश लंके यांनाही स्मार्ट मीटर बसवण्याला तीव्र विरोध केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात कोठेही स्मार्ट वीज मीटर बसवून देणार नाही. जर सक्तीने बसवण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन उभारण्याचा थेट इशारा लंके यांनी ‘महावितरण’ला दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात विजेच्या स्मार्ट मीटरचा प्रश्न अधिक तीव्र होणार असल्याचे दिसतेय. .जिल्ह्यातील विजेच्या प्रश्नावर खासदार लंके यांनी प्रा. सीताराम काकडे, रामेश्वर निमसे, माजी नगरसेवक दीप चव्हाण यांच्यासोबत ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत स्मार्ट मीटरला तीव्र विरोध केला आहे. ग्राहकांची मागणी नसतानाही ‘महावितरण’कडून विजेचे आधीचे मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवले जात आहे. अनेक भागांत ग्राहकच विरोध करत आहेत. .Smart Electricity Meter: स्मार्ट मीटरची ग्राहकांना सक्ती करू नये : ग्राहक पंचायत.आता त्यात खासदार लंके यांनी उडी घेेतली आहे. राज्य सरकार एकीकडे सांगते, की स्मार्ट मीटरची सक्ती नाही. मात्र दुसरीकडे शहरात व ग्रामीण भागामध्ये दमदाटी करून जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. हा प्रकार तातडीने बंद करा, यापुढे जिल्ह्यात कुठेही स्मार्ट मीटर बसवू देणार नाही. वेळ पडल्यास जनतेच्या प्रश्नांसाठी तीव्र आंदोलन उभे करू, असा थेट इशारा लंके यांनी दिला आहे..Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर.अधिकाऱ्यांकडून होणारी पैशांची मागणी आणि शेवगाव तालुक्यात बांबूवर ओढलेल्या विजेच्या तारा यांसारख्या गंभीर बाबी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांसमोर आणल्या. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्याचे काम ‘महावितरण’ करत नाही. काही अधिकारी व कर्मचारी अरेरावीची भाषा वापरतात. ज्या गावांमध्ये सिंगल फेज योजना नाही, त्या गावांची यादी करून त्यांना तातडीने वीज द्यावी. श्रीगोंदे तालुक्यात व नगर शहरामध्ये ‘महावितरण’च्या बेभरवशी कारभारामुळे निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. संबंधित दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली..‘महावितरण’चा कारभार सध्या पूर्णपणे ‘रामभरोसे’ झाला आहे. शेवगाव तालुक्यात अक्षरशः बांबूवर विजेच्या तारा ओढल्या आहेत, तर अहिल्यानगर शहरात बहुतांश भागातील डीपी उघड्या आहेत. महावितरण नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. तसेच शहरासह ग्रामीण भागात ग्राहकांची मागणी नसतानाही विजेचे आधीचे मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवले जात आहेत, ते थांबले नाही तर आंदोलन करणार आहे.- नीलेश लंके, खासदार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.