Sugar Industry : साखर उद्योगातील नवे तंत्रज्ञान आर्थिक विकासाला बळ देईल

Economic Development : साखर उद्योगातील नवे तंत्रज्ञान आर्थिक विकासाला बळ देईल, असे प्रतिपादन निवृत्त जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
Daulat Desai
Daulat DesaiAgrowon

Sangli News : साखर उद्योगातील नवे तंत्रज्ञान आर्थिक विकासाला बळ देईल, असे प्रतिपादन निवृत्त जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. येथील राजारामबापू शुगर टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

Daulat Desai
Sugar Production : साखर उत्पादन वाढले पाच लाख टनांनी, उतारा मात्र घटला

संस्थेचे संस्थापक बी. डी. पवार अध्यक्षस्थानी होते. क्रांती कारखान्याचे डिस्टिलरी सरव्यवस्थापक अनिल शिंदे, शुगर टेक्नॉलॉजीचे संचालक उमेश पवार, व्ही. आर. कलेढोणकर, प्रा. आर. एम. पवार, अभिजीत मगदूम प्रमुख उपस्थित होते.

देसाई म्हणाले, की साखर कारखान्यातून बाहेर पडणारी प्रत्येक गोष्ट जेव्हा मूल्यवर्धित असेल, तेव्हा त्या ठिकाणी सर्वच घटकांचा विकास होईल. त्यासाठी कारखान्यातील प्रत्येक टाकाऊ पदार्थावर प्रक्रिया केली पाहिजे.

Daulat Desai
Sugar Export : साखर निर्यातीचे वास्तव

काही कारखाने प्रेसमड वरती प्रक्रिया करून त्याचे रूपांतर कंपोस्ट खतात करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहेत. शुगर टेक महाविद्यालयाने बायोरिफायनरीसंबंधी विविध कोर्सेस सुरू करावेत, तसेच साखर उद्योग बायोरिफायनरी होण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान मनुष्यबळ त्यांनी तयार करावे.

संस्थेचे संचालक उमेश पवार म्हणाले, की पुढील काळात संस्थेच्या नवीन जागेत स्थलांतर, शाखा विस्तार, शुगर टेकनोलॉजीचे नवनवीन अभ्यासक्रम, असे व्हिजन आहे. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. सुप्रिया आरेकर, सायली ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. आर. कलेढोणकर यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com