Pune News : राज्यात खत विक्री करताना यापुढे नवे पॉस (पॉइंट ऑफ सेल) उपकरण सक्तीचे करण्यात आले आहे. आधीची ३५ हजार उपकरणे आता शासनाने कालबाह्य ठरवली आहेत. रासायनिक खत विक्री करताना ‘पॉस’ वापरण्याचे बंधन २०१८ पासून आले. मात्र ‘एल-झीरो’ मालिकेतील जुने पॉस उपकरण सदोष होते. शेतकऱ्याच्या आधार ओळख क्रमांकाशी संलग्न व्यवहार करताना जुने पॉस सुरक्षित नव्हते. .त्यामुळे हा दोष हटविण्यासाठी केंद्राने बुधवारपासून (ता.२०) ‘एल-झीरो’ उपकरण कालबाह्य म्हणून घोषित केले आहे. त्याऐवजी देशभरातील विक्रेत्यांना आता ‘एल-वन’ उपकरण वाटले जात आहे. शेतकऱ्याच्या नावे भलत्याच व्यक्तीद्वारे किंवा अंगठ्याच्या बनावट ठश्याद्वारे नव्या पॉसमधून खत विकता येणार नाही, असा दावा शासनाचा आहे..POS Machine in Agriculture: हमीभावाने शेतीमाल खरेदीसाठी आता पॉस मशिनचा वापर.केंद्र शासनाने खत वितरणाच्या मुख्य प्रणालीशी (आयएफएमएस) पॉस उपकरणे जोडली आहेत. त्यामुळे खताचा काळाबाजार काही प्रमाणात रोखला गेला आहे. ‘या उपकरणामुळे खत विक्रीचे व्यवहार पारदर्शक होतो तसेच विक्रीचा बिनचूक हिशेब राखता येतो. विक्रेत्याने नव्या उपकरणाचा वापर न केल्यास कारवाई होऊ शकते,’ असे कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले..POS Machine: राज्यातील ३५ हजार ‘पॉस’ची तपासणी होणार.कृषी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की २० हजार रुपयांपर्यंत किमतीची ही नवी उपकरणे संबंधित खत कंपन्यांनीच मोफत पुरवावीत, असे आदेश केंद्राने दिलेले आहेत. नवे पॉस नसल्यास खत विक्रेता व्यवहार करू शकणार नाही. १९ ऑगस्टपर्यंत राज्यात २९ हजार ‘एल-वन’ उपकरणे बसवली गेली. परंतु सहा हजार उपकरणे अद्यापही कृषी विभागाकडेच आहेत. त्यामुळे विक्रेत्यांनी जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्याकडून (एडीओ) आपापली उपकरणे ताब्यात घेणे अत्यावश्यक आहे..‘एल-वन’मध्ये आर्थिक व्यवहाराची सोयनव्या ‘एल-वन’ पॉस उपकरणामुळे भविष्यात आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार आहेत. या उपकरणात आता डेबिट कार्ड ‘स्वाइप’ करण्याची व क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन पैसे देण्याची सुविधा आहे. तथापि, ही सुविधा केंद्राने अजून कार्यान्वित केलेली नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.