Can Tho, Veitnam News: व्हिएतनाममधील शेतकऱ्यांना भात शेती अधिक फायदेशीर बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेतर्फे (IRRI) विविध डिजिटल साधने आणि ॲप्स विकसित केली आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना तत्काळ योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच खर्च कमी करुन नफा वाढवणे शक्य होणार आहे. हा उपक्रम व्हिएतनामच्या भात शेतीला डिजिटल आणि स्मार्ट शेतीच्या दिशेने नेणारा मोठे पाऊल मानले जात आहे..आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेतर्फे कॅन थो येथील पीक उत्पादन आणि वनस्पती संरक्षण उपविभागाच्या सहकार्याने डिजिटल प्रशिक्षण अभियान सुरू केले आहे. यामध्ये ३८ प्रशिक्षण कार्यशाळांच्या माध्यमातून सुमारे २,५०० शेतकरी, कृषी अधिकारी आणि भात व्यवसायाशी संबंधित लोकांना आधुनिक डिजिटल साधनांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे व्हिएतनाममध्ये शेतकऱ्यांना मोबाइल आणि इंटरनेटच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनातील निर्णय घेण्याची, नफा वाढवण्याची आणि बाजाराशी जोडण्याची संधी मिळाली आहे. संस्थेने विकसित केलेल्या डिजिटल साधनांमध्ये राइस क्रॉप मॅनेजर, ई-एक्स्टेंशन लुआ व्हिएत आणि इझीफार्म या अॅप्सचा समावेश आहे..India Rice Exports: भारताची २६ देशांत तांदूळ निर्यातीची तयारी, २५ हजार कोटींचे करार शक्य, काय आहे योजना?.१. राइस क्रॉप मॅनेजर म्हणजे भातपीक व्यवस्थापक. हे ॲप शेतात योग्य प्रमाणात खत, पाणी आणि इतर गोष्टी कशा वापराव्यात याबद्दल सल्ला देते. त्यामुळे पीक व्यवस्थापनाच्या खर्चात बचत होते, उत्पादन वाढते.२. ई-एक्स्टेंशन लुआ व्हिएत ही वेबसाइट आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना भात शेतीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना, कीड नियंत्रणाचे उपाय सांगितले जातात. तसेच वेबसाईटवर सरकारच्या ‘वन मिलियन हेक्टर’ प्रकल्पाबाबत माहिती मिळते.३. इझीफार्म ॲप शेतकऱ्यांना खत विक्रेते, यंत्रसामग्री पुरवठादार, व्यापारी आणि इतर शेतमाल खरेदीदारांशी जोडते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत विक्री आणि खरेदी सोपी झाली आहे..या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शंभरहून अधिक कृषी अधिकाऱ्यांना पुढील काळात इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. इझीफार्म ॲपवरील विशेष सत्रात सहाशेपेक्षा जास्त व्यावसायिक प्रतिनिधींनी भाग घेतला. हे लोक खत, यंत्रसामग्री, शेतीसाठी उपकरणे आणि बाजारपेठेतील सेवा देतात. आता हे सर्व लोक या ॲपद्वारे शेतकऱ्यांना थेट सेवा पुरवू शकणार आहेत..आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेतील वैज्ञानिक डॉ. गुयेन व्हॅन हंग म्हणाले की, डिजिटल साधने शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतात. त्यामुळे त्यांचा खर्च कमी होईल आणि नफा वाढेल. याशिवाय हवामान बदलासारख्या अडचणींचा सामना करणे सोपे होईल. प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना डिजिटल शेतीचे फायदे समजतील आणि भविष्यात अधिक शेतकरी यात सहभागी होतील..कॅन थो उपविभागाच्या प्रमुख फाम थी मिन्ह हियू म्हणाल्या की, तंत्रज्ञानाचा वापर मे काँग नदीच्या डेल्टा भागात मोठ्या प्रमाणावर करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण मे काँग नदीच्या डेल्टा भागात या उपक्रमाचा परिणाम व्यापक होऊन भात शेती अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर होणार आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.