Milk Dairy : ५० लिटरपेक्षा कमी दूध संकलन असलेल्या संस्थांबाबत नवा आदेश

Kolhapur Milk Dairy : कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ११०० हून अधिक संस्थांचे संकलन कमी, मतदान झालेले नाही, लेखापरीक्षण झालेले नाही, अशाच आहेत.
Milk dairy
Milk dairyAgrowon
Published on
Updated on

Milk Dairy News : कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या संस्थांचे दूध संकलन प्रतिदिन दररोज ५० लिटरपेक्षा कमी आहे, अशा संस्था अवसायनात का काढू नये, अशी नोटीस सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी दिली होती. यामुळे जिल्ह्यातील जवळपास १ हजार १०० दूध संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे काम गतीने सुरू होते.

या संस्था केवळ दूध संघांच्या ठरावासाठीच स्थापन केल्या असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. दरम्यान यावर आता सहनिबंधकांनी नवा आदेश काढल्याने या दूध संस्थांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ५० लिटरपेक्षा कमी दूध असणाऱ्या दूध संस्था अवसायनात काढू नयेत, असे आदेश सहकारी दुग्ध संस्थांचे सहनिबंधक शहाजी पाटील यांनी पुणे विभागीय उपनिबंधक यांना काल देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ११०० हून अधिक संस्थांच्या कारवाईला तात्पुरता ब्रेक लागला आहे.

त्यामुळे पहाणी आणि संस्थांचे लेखापरीक्षण झाले आहे किंवा नाही, याची पडताळणी करून अशा संस्थांना कुलूप लावले जाणार होते. जिल्ह्यात आतापर्यंत ११०० हून अधिक संस्थांचे संकलन कमी, मतदान झालेले नाही, लेखापरीक्षण झालेले नाही, अशाच आहेत, अशा संस्थांच्या कारवाईला स्थगिती मिळाली आहे.

शासनाने दुधाचा महापूर योजना राबविल्यापासून सहकारी संस्थांच्या माध्यमातून गाव पातळीवरील प्राथमिक सहकारी दूध उत्पादक संस्थांच्या नोंदणीसाठी प्रोत्साहन म्हणून राज्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्राथमिक सहकारी दूध संस्थांची स्थापना केली आहे.

दूध उत्पादनात राज्याला स्वयंपूर्ण बनविण्यात त्यांचा वाटा आहे. सध्या राज्यातील दुष्काळी स्थिती आणि 'लम्पी'चा प्रादुर्भाव लक्षात घेता दूध उत्पादन घटले आहे. शेतकऱ्यांना अशाच दूध संस्थांनी सावरले आहे. त्यामुळे दूध संकलन सुरू असलेल्या सहकारी संस्था अवसायनात काढण्याविषयो सहकार कायद्यात तरतूद वा तसा कोणताही आदेश नसल्याचेही आदेशात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com