दुष्काळात तग धरणारे नवीन भात वाण विकसितत्याला 'अरुण' नाव देण्यात आले आहेहे भात वाण दुष्काळ सहनशील आहेविशेषतः अनियमित पाऊस, हवामान बदल परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार.Paddy Variety: प्रतिकूल हवामानाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दुष्काळ सहनशील म्हणजेच दुष्काळात तग धरणारे नवीन भात वाण सादर करण्यात आले आहे. आसाममधील तिताबार येथील आसाम भात संशोधन संस्थेने (ARRI) हे वाण विकसित केले आहे. ते अधिकृतपणे कृषी शास्त्रज्ञ डॉ. अरुण पाठक यांच्या सन्मानार्थ शेतकऱ्यांसाठी जारी करण्यात आले आहे..शेतकरी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आसामचे कृषिमंत्री अतुल बोरा यांनी हे भात वाण सादर केले. त्याला 'अरुण' नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमात शेतकरी मेळावा, राज्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान आणि अनेक नवीन कृषी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला..यावेळी बोलताना मंत्री बोरा यांनी सांगितले की, डॉ. पाठक यांनी स्वतः त्यांच्या हयातीतच नवीन भाताच्या वाणाला 'अरुण' हे नाव दिले. .हे भात वाण दुष्काळ सहनशील असून विशेषतः अनियमित पाऊस आणि हवामान बदलाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. .Paddy Crop Loss: धानपट्ट्यात ७७ हजार हेक्टरला फटका; अर्थकारण बिघडले."आपण बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन पुढे पावले उचलली पाहिजेत. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे आपल्या शेतकऱ्यांना खूप मदत होईल," असे बोरा म्हणाले. त्यांनी आसामच्या शेतीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हवामानाशी अनुकूल वाण विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले..Paddy Crop Damage: पावसामुळे ‘हळव्या’ नंतर आता गरवा भातही उद्ध्वस्त .या नवीन भात वाणामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण प्रदेशात, विशेषतः आसाममध्ये प्रतिकूल हवामानाच्या वाढत्या परिणामांना तोंड देताना मदत होईल असे अपेक्षा आहे. यंदाच्या वर्षात राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये सुमारे ४० टक्के पाऊस कमी झाला. यामुळे तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आसाम सरकारने तातडीने हाती घेण्यात येणाऱ्या उपाययोजना आखल्या आहेत. याबाबतची अधिसूचना जारी केली आहे..शाश्वत शेती आणि पीक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुमारे एक हजार सुपारीच्या रोपांचे वाटप केले..१९१३ मध्ये करीमगंज येथे पहिले केंद्र स्थापन झाले होते. त्यानंतर १९२३ मध्ये स्थापन करण्यात आलेले हे भात संशोधन केंद्र सर्वात जुन्या केंद्रांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत, भात संशोधन आणि पीक विकासात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या केंद्राला आयसीएआरने देशातील सर्वोत्तम भात संशोधन केंद्र म्हणूनदेखील मान्यता दिली आहे," असे त्यांनी नमूद केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.