Tulip Farming: क्युकेनहॉफ उद्यान अन् जागतिक फुलशेतीचे मॉडेल
Netherlands Agriculture: अभ्यासदौऱ्यामध्ये मला नेदरलँड्समधील ट्युलिप फुलशेती आणि संशोधनाची चांगली माहिती मिळाली. त्या निमित्ताने जगप्रसिद्ध क्युकेनहॉफ उद्यानामध्ये कृषी पर्यटनाचाही अनुभव घेता आला. कृषी पर्यटन, निर्यातक्षम उत्पादन आणि संशोधनाधारित आधुनिक तंत्रज्ञानाने ग्रामीण अर्थव्यवस्था कशी बदलू शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे. नेदरलँड्स आज फुलांचे जागतिक वितरण केंद्र म्हणून ओळखले जाते.