आपल्या शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये युवकांनी सरकारविरोधात हिंसक आंदोलन करीत चक्क सत्ता उलथून टाकली आहे. हे आंदोलन इतके तीव्र होते, की त्याच्या झळा नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्यासह संसद भवन, सर्वोच्च न्यायालय तसेच माजी पंतप्रधानांना देखील बसल्या. .समाज माध्यमांवरील घातलेली बंदी हे नेपाळमधील उद्रेकाचे तत्कालिक कारण ठरले. परंतु या असंतोषाच्या मुळाशी नेपाळमधील वाढती बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, तसेच आर्थिक विषमता दडलेली आहे. समाज माध्यमांवरील बंदीने तरुणाईच्या मनात आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आल्याची भावना होती. नेपाळची लोकसंख्या जेमतेम तीन कोटी आहे..Nepal Youth Protests: नेपाळ संसदेला घेराव, राष्ट्रपती भवनावर कब्जा; पंतप्रधान ओलींनी दिला राजीनामा .त्यात जेन-झी म्हणजे १६ ते २५ या वयोगटातील तरुणांची संख्या अधिक आहे. असे असताना बहुतांश तरुणांच्या हाताला काम नाही. त्यामुळे रोजगारासाठी बहुतांश तरुणांना शेजारच्या देशांत जावे लागते..नेपाळमध्ये गरीब-श्रीमंतांची दरीही अधिकाधिक खोल होत आहे. देशातील ५६ टक्के संपत्ती केवळ २० टक्के श्रीमंतांपाशी, त्यातही सरकारमधील मंत्री आणि प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांपाशी एकवटली आहे. हा विरोधाभास समाज माध्यमांतून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत असल्याने त्यावर बंदीचा घाट घातला गेला..Nepal Youth Protests: सरकारच्याविरोधात तरुणांचे बंड; नेपाळमध्ये सोशल मिडियावर बंदी.नेपाळमध्ये राजेशाहीचा अंत २००८ मध्ये झाला. मात्र मागील १७ वर्षांत या देशात लोकशाही चांगल्या प्रकारे रुजली नाही. त्यामुळे तिथे कायम अस्थिर सरकार राहिले आहे. अशा अस्थिर सरकारने विकासाऐवजी भ्रष्टाचाराला प्राधान्य देत एकंदरीत राजेशाहीचीच परंपरा पुढे चालविली आहे. या सर्वांच्या परिणामस्वरुप जेन-झीच्या असंतोषाच्या ज्वालामुखीचा विस्फोट झाला. .नेपाळमधील राजकीय अराजकतेचा सर्वाधिक फटका हा पर्यटनाला बसला आहे. नेपाळच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाचा मोठा वाटा आहे. अशा वेळी हिंसक संघर्ष हा या देशाला परवडणारा नाही, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. कोरोना काळात या देशाचा घसरलेला आर्थिक गाडा अजूनही रुळावर आलेला नाही..Nepal Protest: नेपाळचे पंतप्रधान ओली, राष्ट्रपती पौडेल यांचा राजीनामा.या देशात नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारने गुंतवणुकीला प्राधान्य देत विकासाची कास धरायला हवी. या विकासात सर्वसामान्य जनतेसह तरुणांचा अधिकाधिक समावेश कसा करून घेता येईल, हेही पाहावे. आपल्या शेजारील पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, म्यानमार, भूतान आणि आता नेपाळ अशा बहुतांश देशांना विध्वंसक उद्रेकाने ग्रासलेले आहे. व्यापार युद्धाच्या काळात आजूबाजूचे असे विद्रोही वातावरण आपल्या प्रगतीत बाधा आणू शकते..नेपाळमधील जेन-झी च्या उद्रेकातून भारतानेही काही धडे घ्यायला हवेत. तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात अनेकांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारी वाढलेली आहे. देशात भ्रष्टाचारही बोकाळला आहे. एक टक्का श्रीमंतांकडे देशाच्या एकूण संपत्तीच्या ५३ टक्के संपत्ती एकवटली आहे. अर्थव्यवस्थेचा एक मोठा घटक शेतकरी संकटात आहे..आर्थिक विषमतेतूनच आरक्षणासारख्या सामाजिक समस्येचा मुद्दा देशात पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. माध्यमांची गळचेपी भारत देशातही सुरू आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे..शेतकरी असो की युवक त्यांच्या आंदोलनांकडे एकतर दुर्लक्ष केले जात आहे, नाही तर ते मोडीत काढण्याचे प्रयत्न होत आहेत. नेपाळमधील उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर या सर्व बाबींचा आपल्या देशातही गांभीर्याने विचार व्हायला हवा. जनतेच्या मनांत काय चालू आहे, हे जाणून सरकारने सावध पावले उचलायला हवीत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.