News: नेपाळ सरकारने नुकतीच फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअॅपसह तब्बल २६ सोशल मीडिया अॅपवर बंदी घातली आहे. या बंदीचा विरोध करणाऱ्या तरुणांनी राजधानी काठमांडूसह विविध शहरांमध्ये मोठे आंदोलन केले. युवकांनी थेट संसदेत प्रवेश करून सरकारच्या विरोधात आवाज उठवला, त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू तर देशभरात नऊ जणांचा मृत्यू झाला असून तीन पत्रकार जखमी झाले आहेत. या देशात अनेक भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला असून परिस्थिती गंभीर आहे..एका आंदोलकाचा मृत्यू…या बंदीच्या विरोधात नेपाळची राजधानी काठमांडूसह देशातील अनेक शहरांमध्ये सोमवारी मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. आंदोलकांनी थेट नेपाळच्या संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला, ज्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला..Maratha Protest: पुन्हा नाकेबंदी न परवडणारी.देशभरातील विविध ठिकाणी झालेल्या हिंसक घटनांमध्ये एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन पत्रकार गंभीर जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने काठमांडूसह अनेक भागांमध्ये कर्फ्यू लागू केला आहे..पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचा इशारा…नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी या आंदोलनांबाबत कठोर इशारा दिला आहे. त्यांनी तरुणांना चेतावणी देत म्हटले आहे की, या निदर्शनांची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल..Maratha Reservation Protest: मराठवाड्यातील मराठे हे कुणबीच, मुदतवाढ नाहीच!.सरकारने सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घालण्यामागचे कारण सांगितले आहे की, फेसबूक, यूट्यूब यासारख्या कंपन्यांनी नेपाळमध्ये आपली कार्यालये उघडलेली नाहीत आणि त्यांचे सर्व्हरही नेपाळच्या बाहेर आहेत. यामुळे सरकारला या प्लॅटफॉर्मवर नियंत्रण ठेवणे कठीण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे..आंदोलकांनी सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला असून, बंदी मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.दुसरीकडे, सरकारने या बंदीमागे देशाच्या सुरक्षेचा आणि स्थानिक कायद्यांचा दाखला दिला आहे..मात्र, या निर्णयामुळे नेपाळमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण तणावपूर्ण बनले आहे. आंदोलन आणि हिंसक घटनांमुळे देशातील परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही परिस्थिती कशी हाताळली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.