Malegaon Upper Tehsil Office : मालेगावला अप्पर तहसील कार्यालयाची गरज

Revenue Department : नाशिक कार्यालयाचे विभाजन करून मालेगावला अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी होत आहे. नाशिक येथे अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे.
Malegaon Map
Malegoan MapAgrowon
Published on
Updated on

Nashik News : नाशिक कार्यालयाचे विभाजन करून मालेगावला अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी होत आहे. नाशिक येथे अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच मालेगावात देखील अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित करण्याची गरज आहे.

वाढते नागरीकरण, शहरीकरण, लोकसंख्या, राज शिष्टाचाराचा व्याप मोठ्या प्रमाणावर आहे. तहसील कार्यालयात सद्यःस्थितीत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जनतेला आवश्यक ती सेवा पुरवणे अडचणीचे ठरत आहे. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने, कामात गतिमानता यावी याकरिता मालेगावला "अप्पर तहसील कार्यालय" स्थापन करणे आवश्‍यक आहे.

Malegaon Map
Anagar Tehsil : अनगर तहसील कार्यालयावर टांगती तलवार, शासन निर्णयाची प्रतीक्षा

अप्पर तहसील कार्यालयासाठी शासनाने मान्यता दिली आहे. या कार्यालयासाठी ४ पदे नियमित वेतन श्रेणीवर मंजूर करण्यात आली आहे. त्यात अप्पर तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक (लिपिक, टंकलेखक) असे पदे असतील. यामध्ये एकूण ३ महसूल मंडळे व १० गावांचा समावेश राहील.

मालेगाव हे मोठ्या लोकसंख्येचे शहर असून त्यात १२ महसूल मंडळे कार्यान्वित आहे. तहसीलदार, मालेगाव तसेच अप्पर तहसीलदार मालेगाव यांच्या कार्यक्षेत्रातील महसूल मंडळ अंतर्गत तलाठी सझे यांची गावे कार्यान्वित आहेत. मालेगाव तहसीलसाठी १२ मंडळे आणि १४१ गावांचा समावेश आहे. सामान्य जनतेला त्याचा फायदा होईल. शासकीय कामे गतिमान होतील. तसेच काही पदे रिक्त आहेत ती त्वरित भरण्यात यावीत.

Malegaon Map
Upper Tehsil Office : अनगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द

प्रस्तावित कार्यालय

नवीन अप्पर तहसील

एकूण महसूल मंडळे ३ मालेगाव, करंजगव्हाण, सायने

मालेगावात अप्पर तहसील कार्यालय स्थापन करणे गरजेचे आहे. शासनाने मंजुरी दिली आहे. शासन स्तरावरून अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. सामान्य जनतेला न्याय मिळेल व तहसील प्रशासनाचा भार हलका होण्यास मदत होईल त्यामुळे शासनाने अप्पर तहसील कार्यालय मालेगावला त्वरित सुरू करावे.
- आर. पी. कुवर, सामाजिक कार्यकर्ते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com