Cotton Research : जर्मप्लाझमचा प्रभावी वापर ळाची गरज ः डॉ. मायी

Dr. C.D. Mayee : केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत ‘जर्मप्लाझम फिल्ड डे’निमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. मायी बोलत होते.
Cotton Research
Cotton ResearchAgrowon

Nagpur News : ‘‘कापूस पैदासकार तज्ज्ञांनी जर्मप्लाझमचा योग्य वापर करुन नवीन कपाशीचे संकर, सरळ वाण विकसित करण्यावर भर द्यावा,’’ असे आवाहन भारतीय शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांनी केले.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत ‘जर्मप्लाझम फिल्ड डे’निमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. मायी बोलत होते. डॉ. मायी म्हणाले, ‘‘जर्मप्लाझमचा योग्य वापर करण्याबरोबरच त्याच्या हस्तांतरणासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी देखील तितकीच महत्वाची ठरणार आहे.’’

Cotton Research
Cotton Cultivation : कापूस घन लागवड लाभदायक

‘सीआयसीआर’चे संचालक डॉ. वाय. जी प्रसाद यांनी भारतातील कापूस जर्मप्लाझम संकलनाबद्दल थोडक्‍यात माहिती दिली. ‘‘निवड केलेल्या जर्मप्लाझमच्या वापराबद्दल कृषी विद्यापीठासह खासगी कंपन्यांनी देखील आपली भूमिका मांडण्याची गरज आहे,’’ असे ते म्हणाले.

Cotton Research
Cotton Market : कापूस विकावा की साठवून ठेवावा?

पीक सुधार विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. एन. वाघमारे यांनी या वेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ५६ पेक्षा अधिक कापूस पैदासकार, यासह भारताच्या विविध कृषी विद्यापीठातील ३७, खासगी बियाणे कंपन्यांचे १९ अणि कापूस संशोधन केंद्राअंतर्गत असलेल्या प्रादेशिक संशोधन केंद्राचे तज्ज्ञ या वेळी उपस्थित होते.

कापूस पैदासकारांना त्यांच्या संकर, सरळ वाण विकसित करण्याच्या दृष्टीने ‘जर्मप्लाझम’ची निवड करण्यासाठी प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. विनिता गोतमारे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सर्वानन एम., डॉ. हरिश कुंभलकर यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com