Parliament Monsoon Session 2026: राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मधील खासदारांनी मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) संसद परिसरातील मकर द्वारपर्यंत मोर्चा काढला. झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधारी खासदारांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. गृहमंत्री अमित शहा चर्चेसाठी तयार आहेत, पण विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप एनडीए खासदारांनी केला. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईवर राहुल गांधींनी उत्तर द्यावे, असे फलक त्यांनी झळकावले. .भाजप नेते अरुण सिंह म्हणाले की, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी झारखंडला का जात नाहीत? जिथे काँग्रेस सरकार सत्तेत आहे. तिथे तरुणांना क्रूरपणे मारहाण करण्यात आली. यावर राहुल गांधींनी उत्तर द्यावे. ते या सगळ्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी झारखंडमध्ये जायलाच हवे..त्यांनी (राहुल गांधींनी) चर्चेस नकार दिला आहे. ते देशाला धोका देत आहेत. ते संसदेचे कामकाज एक दिवसही चालू देत नाहीत, असे भाजप खासदार कंगना रनौत म्हणाल्या. रांचीमध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. ते यावर आज गप्प का आहेत? असा सवाल भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी केला. .Parliament Monsoon Session: '२१ विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं अन् तुम्ही प्रधानांचं संसदेत स्वागत करता'; गौरव गोगोईंचा सरकारवर हल्लाबोल .याचदरम्यान, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वधेरा संसद परिसरात दाखल झाल्या. यावेळी एनडीएचे खासदार आंदोलन करत होते. यावेळी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या, "राहुल गांधी यांनी झारखंडमध्ये विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे.".Parliament Monsoon Season 2026: संसदेत विरोधकांची आक्रमक भूमिका कायम, 'एमपीएससी' पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांचीही निदर्शने.एनडीए खासदारांच्या आंदोलनावर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शिक्षणावर दोन दिवस चर्चा झाली, तेव्हा राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी त्यांचे मत मांडले. ज्यावर भाजप सरकारकडून अनेक वक्तव्ये समोर आली आणि जितेंद्र सिंह यांनीही आपले म्हणणे मांडले. तेव्हा अमित शाह कुठे होते? त्यावेळी त्यांनी चर्चेत सहभाग का घेतला नाही? त्यांनी सभागृहात यावे, अशी मागणी आम्ही १५ दिवसांपासून करत आहोत, तेव्हा ते कुठे आहेत? विद्यार्थ्यांवर पेलेट गन चालवण्याचा आदेश कुठून आला? तो त्यांच्या कार्यालयातून देण्यात आला होता की त्यांना त्याची काही कल्पना नव्हती? त्यांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा आणि राम मंदिरातील दान चोरीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. .विरोधकांची निदर्शने सुरुचतर दुसरीकडे काँग्रेस खासदार प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव आणि इतर विरोधी खासदारांनी राम मंदिरातील दान चोरीच्या मुद्यावरुन संसद परिसरात निदर्शने केली..लोकसभेचे कामकाज अवघ्या ४ मिनिटांत तहकूबदरम्यान, विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवर अमित शहा यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. "प्रश्नोत्तराचा तास खूप महत्त्वाचा आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. यामुळे सभागृहाच्या कामकाजात पारदर्शकता येते. अनेक खासदारांनी माझी भेट घेऊन प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवण्याची विनंती केली, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. तरीही विरोधकांचा गोंधळ सुरुच राहिल्याने अवघ्या चार मिनिटांच्या आत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.