Water Crisis : ‘नाझरे’ पडले कोरडे

Water Shortage : कमी पडलेल्या पावसाचे परिणाम जाणवू लागले आहेत. पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळील नाझरे धरण कोरडे पडले आहे.
Nazre Dam
Nazre DamAgrowon

Pune News : कमी पडलेल्या पावसाचे परिणाम जाणवू लागले आहेत. पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळील नाझरे धरण कोरडे पडले आहे. त्यामुळे बारामती तालुक्यासह पुरंदर तालुक्यासाठी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या तीन नळ प्रादेशिक योजना बंद पडल्या आहेत.

या योजनांद्वारे २२ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होता. मात्र, नाझरे धरणातील पाणी पूर्ण आटले असल्याने १९ मार्चपासून हा पाणीपुरवठा पूर्णपणे थांबवला आहे. मात्र पर्यायी सुविधा सुरू नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Nazre Dam
Water Crisis : जालन्यातील गावांत पाण्याचे स्रोत आरक्षित

बारामती, पुरंदर तालुक्यासाठी वरदान असलेल्या नाझरे धरणांची क्षमता ०.५९ टीएमसी आहे. यंदा पावसाळ्यात या धरणक्षेत्र परिसरात अवघा ३३४ मिलिमीटर एवढाच पाऊस पडला.

त्यामुळे धरणांत पुरेसा पाणीसाठा झालेला नव्हता. गेल्या वर्षी याच काळात या धरणांत ०.३२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची फारशी अडचण भासली नाही. परंतु चालू वर्षी कमी पावसामुळे धरण कोरडे पडले आहे.

Nazre Dam
Water Crisis : पाणीसंकट गडद; प्रत्येक थेंब महत्त्वाचा

नाझरे धरणावर मोरगाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पुरंदर तालुक्यातील मावडी तर बारामती तालुक्यातील मोरगाव, तरडोली, आंबी बुद्रूक, आंबी खुर्द, भोंडवेवाडी, बाबुर्डी, शेरेवाडी, लोणी भापकर, माळवाडी, काटी, जळगाव कप, जळगाव सुपे, भिलारवाडी, कऱ्हावागज, अंजनगाव या सोळा गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो.

तर पारगाव- माळशिरस योजनेवर कोळविहरे हे गाव तसेच नाझरे प्रादेशिक योजनेवर नाझरे कप, नाझरे सुपे, पांडेश्वर आदी पाच गावे अवलंबून आहेत. मात्र (ता.१९) नाझरे धरणातील पाणी पूर्णपणे संपले असल्याने पिण्याच्या पाण्याच्या नळ योजना बंद केल्या आहेत. बारामती तालुक्यासह पुरंदर तालुक्यातील २२ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा कराव्या लागत आहे. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था न केल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com