Natural Farming : नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा : डॉ. आर. एल. काळे

Dr. R.L. Kale : तापमानात होणारी वाढ व वातावरणातील बदल याचा समन्वय साधून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा. आज ही शेतीपद्धती काळाची गरज बनली आहे, असे आवाहन वाशीम कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांनी केले.
Dr. R.L. Kale
Dr. R.L. KaleAgrowon
Published on
Updated on

Washim News : तापमानात होणारी वाढ व वातावरणातील बदल याचा समन्वय साधून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा. आज ही शेतीपद्धती काळाची गरज बनली आहे, असे आवाहन वाशीम कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र आणि उमेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषी सखी’ प्रशिक्षण कार्यक्रम कारंजा लाड येथील गुरुदेव सेवा आश्रम येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी गृहविज्ञान प्रमुख शुभांगी वाटाणे, उद्यानविद्या विषय विशेषतज्ज्ञ एन. बी. पाटील, कृषी अर्थशास्त्र विशेषतज्ज्ञ डॉ.डी. एन. इंगोले, डॉ. मयूर देशमुख, प्रमोद देशमुख, एस. आर. बावसकर, अक्षय गिरी, आदित्य देशमुख, रवींद्र गायकवाड, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक सुधीर खुजे कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी कारंजालाड, मानोरा व मंगरूळपीर तालुक्यातील कृषी सखींनी सहभाग घेतला.

Dr. R.L. Kale
Natural Farming Training : तोंडापूर ‘केव्हीके’मध्ये कृषी सखींना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण

श्री. खुजे यांनी नैसर्गिक शेतीमध्ये विविध पीक पद्धतीचा अवलंब करावा, आरोग्याच्या दृष्टीने नैसर्गिक शेती करणे कितपत फायद्याचे आहे याचे महत्त्व मांडले. प्रमोद देशमुख यांनी निमस्त्र, अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र अर्क, दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत व वापरण्याची पद्धत समजावून सांगितली.

Dr. R.L. Kale
Natural Farming Program : दोनद येथे कृषी हवामान, नैसर्गिक शेती जागरूकता कार्यक्रम

डॉ. पाटील यांनी नैसर्गिक शेतीमध्ये भाजीपाला लागवड तंत्रज्ञान व हरित क्रांतीचे परिणाम आणि कलम रोपे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. शुभांगी वाटाणे यांनी नैसर्गिक शेतीमध्ये न्यूट्रिशन गार्डनचे महत्त्व आणि मानवी जीवनामध्ये सकस आहाराचे महत्त्व याबद्दल सखोल अशी मार्गदर्शन केले.

डॉ. इंगोले यांनी नैसर्गिक शेतीचा विस्तार करण्याच्या पद्धती व विस्तार करण्याचे माध्यम, विविध पारंपरिक पद्धतीचा वापर करून नैसर्गिक शेतीचा विस्तार कशाप्रकारे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. देशमुख यांनी नैसर्गिक शेतीमध्ये पशुधनाचे महत्त्व, आणि देशी गाईच्या शेण आणि गोमूत्र पासून उत्पादित होणाऱ्या विविध निविष्ठाांबद्दल माहिती दिली. प्रशिक्षणासाठी अक्षय गिरी, आदित्य देशमुख, एस. आर. बावस्कर यांच्यासह इतरांनी प्रयत्न केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com