Akola News: ‘‘आज हवामान बदल, पाणीटंचाई, जमिनीचा ऱ्हास आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. अशा परिस्थितीत, नैसर्गिक शेती ही केवळ पर्याय नसून शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेतीचा मार्ग ठरेल,’’ असा विश्वास आनंद (गुजरात) कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. बी. कथिरिया यांनी व्यक्त केला. .डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (पंदेकृवि) ४० व्या दीक्षान्त सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. विलास खर्चे (राहुरी), डॉ. नितीन पाटील (नागपूर) यांच्यासह माजी कुलगुरू डॉ. विलास भाले, डॉ. सुभाष पुरी यांच्यासह विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, विद्यापीठाचे विविध विभागप्रमुख, अधिष्ठाता उपस्थित होते..Natural Farming: सेंद्रिय शेती पध्दतीचे तंत्रज्ञान बांधावर पोहोचवावे : डॉ. सिंह.डॉ. कथिरिया पुढे म्हणाले, की भारतातील शेती हजारो वर्षांपासून निसर्गाशी सुसंगत राहिलेली आहे. जमिनीचे आरोग्य, जैवविविधता, कमी बाह्य निविष्ठा आणि पर्यावरणीय संतुलन या तत्त्वांवर आधारित नैसर्गिक शेती शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका, आरोग्यदायी अन्न देण्यास सक्षम आहे. विद्यार्थ्यांनी ही पद्धत आधुनिक काळात प्रसारित करण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विस्तार करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे..विदर्भातील शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे येथे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला मर्यादा आहेत. यावर उपाय म्हणून या कृषी विद्यापीठाने प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे ११ जिल्ह्यांत ११ गावे दत्तक घेत चारसूत्री कार्यक्रम राबवला आहे. यात आधुनिक तंत्रज्ञान वापरून पीक उत्पादन दुप्पट करणे, उत्पादन खर्च ५० टक्क्यांनी कमी करणे, यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करणे, तसेच उत्पादन ते बाजारपेठेपर्यंत मूल्य साखळी विकसित करणे अशा बाबींचा समावेश आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न गेल्या दोन वर्षांत वाढले असून, आदर्श गाव संकल्पना शाश्वत विकासाचे उत्कृष्ट उदाहरण ठरत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले..Natural Farming Maharashtra: नैसर्गिक शेतीसाठी साधन निर्मिती गरजेची: डॉ. नारनवरे.शेती क्षेत्रात अन्न सुरक्षा आणि प्रक्रियेसंबंधी सुधारणाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आज १४० कोटी लोकसंख्येसाठी सुरक्षित, पौष्टिक अन्न उपलब्ध करणे ही नैतिक आणि राष्ट्रीय गरज आहे, असेही ते म्हणाले..डॉ. गडाख म्हणाले, की डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विविध उपक्रम हातात घेत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आजवर या विद्यापीठाने विविध क्षेत्रांत नावलौकिक वाढविला आहे. मॉडेल व्हिलेज, आयडॉल, बीजोत्पादन, संशोधन, शिक्षण, विस्तार अशा विविध क्षेत्रांत काम जोमाने पुढे जात आहे. याचे चांगले परिणामसुद्धा दिसून आलेले आहेत, असे सांगत त्यांनी विद्यापीठाच्या उपलब्धींचा सविस्तर आढावा मांडला..सोहळ्यात २९३६ जणांना पदवी प्रदानविद्यापीठाच्या ४० व्या दीक्षान्त सोहळ्यात २९३६ जणांना पदवी प्रदान करण्यात आली. यात ४८ आचार्य पदव्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले.कीटकशास्त्रात दीपा राणीला ७ सुवर्णएमएस्सीमध्ये (अॅग्रिकल्चर) कीटकशास्त्र विषयात दीपा राणी या विद्यर्थिनीला सर्वाधिक सात सुवर्ण पदके, एक रौप्य व एक रोख पारितोषिक मिळाले. तिला कुलगुरूंच्या हस्ते गौरविण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.