Jayant Patil : 'सध्याचे बीजदर अवाढव्य, वीजदर कमी करण्यात कोणती अडचण' : जयंत पाटील यांचा सरकारला खोचक सवाल

Expensive Electricity in Maharashtra : देशात सगळ्यात जास्त महाग वीज महाराष्ट्रात मिळत असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकरावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
Jayant Patil
Jayant PatilAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील वीज दर देशात सर्वाधिक असून यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी यावरून महायुतीला घेरलं आहे. यावेळी जयंत पाटील यांनी इतर राज्यांचे वीज दरांची माहिती देताना, मोफत वीज देऊ म्हणणारे आता बहुमताने सत्तेत बसले आहेत. आतातरी राज्यातील जनतेला कमी दरात वीज मिळणार का? राज्यातील अवाढव्य वीजदर कमी करण्यात सरकारला कोणतीच अडचण नसावी, असाही टोला लगावला आहे.

राज्यात वीज दरात सतत वाढ होत असून विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान वीज दरात कपात करू असे आश्वास या महायुतीने दिले होते. यावरून जयंत पाटील यांनी महायुतीवर निशाना साधला आहे. जयंत पाटील यांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करत महायुती टोला लगावला आहे.

Jayant Patil
Jayant Patil Sugar Factory : ‘राजारामबापू’ कारखान्यांकडून पहिली उचल ३ हजार २०० जाहीर

जयंत पाटील यांनी देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक वीज महाग असल्याचा दावा करताना, वीज बिलात ३०% कपात करू असे आश्वासन महायुतीने दिले होते. पण कपात सोडाच उलट आपल्याकडे इतर राज्यांपेक्षा वीज महाग आहे. राजस्थानमधील जनतेला प्रति युनिटला ७.५५ - ८.९५ रुपये मोजावे लागतात. मध्य प्रदेशमधील वीजेचा दर प्रति युनिट ३.३४ ते ६.८० रुपये आहे. तर कर्नाटकात सरसकट प्रति युनिट ५.९० रुपयांनी वीज दिली जात आहे. मात्र आपल्या राज्यात सर्वात जास्त वीजदर असून प्रति युनिट ५.१६ ते १७.७९ रुपये मोजावे लागत आहेत.

महायुतीचे वीज बिलात ३०% कपात करू, शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ असे आश्वासन देत होते. आता तर ते बहुमताने सत्तेत आहेत. त्यामुळे यांना अवाढव्य वीजदर कमी करण्यासाठी कोणती अडचण आहे, असा सवाल जयंत पाटील केला आहे.

Jayant Patil
Maharashtra Electricity : महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने राजकीय पक्षांपुढे ठेवला अपेक्षानामा

वीज ग्राहक संघटनेचाही आरोप

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक वीज महाग असल्याचा दावा याआधी राज्य वीज ग्राहक संघटनेने केला होता. याबाबच संघटनेने ऑक्टोंबर महिन्यात आरोप करताना, घरगुती, छोटे व्यावसायिक आणि छोटे औद्योगिक घटकांचे वीजदर इंधन समायोजन आकार वगळला देशातील सर्वात महाग वीज आपल्या राज्यात असल्याचे म्हटले होते. तसेच वीजदरात प्रतियुनिट दोन रुपयांनी सवलत देण्यात यावी, अशीही मागणी केली होती.

दिवगंत जेष्ठ वीज तज्ज्ञ होगाडे यांचा दावा

तर दिवगंत जेष्ठ वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी देखील याबाबत वेळोवेळी आवाज उठवला होता. त्यांनी वीज दरावरून महावितरण आणि राज्य सरकार यांनी गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली होती. तसेच फक्त महावितरण कंपनीच्या एकाधिकारशाहीमुळेच वीज महाग होत असल्याचा आरोप केला होता.

आपल्या राज्यातील वीज दर अन्यायकारक आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांचे कंबरडे मोडणारे असून कृषी पंपाचा खरा वीज वापर फक्त १५ टक्केच आहे. पण वितरण कंपण्या खोटी माहिती देत असल्याचा दावा दिवगंत जेष्ठ वीज तज्ज्ञ होगाडे यांनी केला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com