Parbhani News : हवामान बदलामुळे अतिवृष्टी,पूर आदी संकटांमुळे शेती व्यवसायापुढे अनेक आव्हाने निर्माण झाली आहे.या स्थितीत उत्पन्नाची जोखीम करुन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीला प्रोत्साहन द्यावे लागेल. .कृषीच्या विद्यार्थ्यांतून चांगले शेतकरी- नवसंशोधक घडले पाहिजेत.महिला शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न हवेत असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले..‘लघू व सीमान्त शेतकऱ्यांसाठी शेती यांत्रिकीकरण आणि कृषी रोबोटिक्स : आव्हाने आणि संधी’ या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये भारतीय कृषी विद्यापीठे संघ (इंडियन अॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज असोसिएशन-आयएयुए) अंतर्गंत देशातील ७४ कृषी विद्यापीठांच्या १७ व्या राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन गुरुवारी (ता. २५) झाले. यावेळी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा होते..Integrated Farming : एकात्मिक शेतीचा विदर्भात प्रसार व्हावा.पंतनगर येथील लोणारे येथील डॉ. बाबासाहेब तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. व्हि. काळे, प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत देशमुख वरपुडकर, कार्यकारी परिषद सदस्य जनार्दन कातकडे, जी. बी. पंत कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. एस. चव्हाण, आयसीएआरचे माजी उपमहासंचालक डॉ. आर. सी. अग्रवाल, वनामकृविचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा, एनडीआरआयचे कुलगुरू डॉ. धीर सिंग, डॉ. दिनेश सिंह, डॉ. भगवान आसेवार यांची उपस्थिती होती. .राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह देशातील विविध राज्यांतील पिके नष्ट झाली आहेत. नैसर्गिक संकटाच्या स्थितीत तग धरून राहणारे वाण विकसित करावे लागतील. कृषी विद्यापीठांना कामकाजात सुधारणा करावी लागेल. शेतकरी समाधानी झाला तरच भारत आत्मनिर्भर होईल. डॉ.चव्हाण म्हणाले, की स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी होती तशीच शेतकऱ्यांची परिस्थिती आजही आहे ही खेदाची बाब आहे. .Integrated Farming Method : आर्थिक उन्नतीसाठी एकात्मिक शेतीपद्धती फायदेशीर .या परिसंवादातील चार ते पाच शिफारशी धोरणकर्त्यांसाठी उपयुक्त ठरतील त्यांची अंमलबजावणी करावी लागेल. डॉ. धीरजकुमार म्हणाले, की विद्यापीठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान, अवजारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाचे पाठबळ हवे. डॉ. अग्रवाल म्हणाले, की विकसित भारतासाठी मनुष्यबळ संसाधन हे भांडवल आहे. .त्यासाठी गुंतवणूक हवी. डॉ. काळे म्हणाले, की नवीन शैक्षणिक धोरणानुसार पारंपरिक व कृषी विद्यापीठांनी एकत्रित येऊन संशोधन करावे लागेल. डॉ. इंद्र मणी म्हणाले, की गावस्तरावर अचूक हवामान अंदाज पोचविणारी यंत्रणा हवी. जोखीम व्यवस्थापन महत्त्वाचे झाले असून त्यासाठी शेतीला फलोत्पादन, पशुसंवर्धनाची जोड द्यावी लागेल. कुलगुरू, अधिकारी, प्रगतशील शेतकरी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.