SPPU Pune : शिवरायांच्या कार्याविषयी आज सावित्रीबाई फुले विद्यापीठात परिषद

Chhatrapati Shivaji Maharaj : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवार व शनिवारी (ता. ३० व ३१) ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन व कार्याचे २१व्या शतकातील महत्त्व आणि समयोचितता’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajAgrowon
Published on
Updated on

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवार व शनिवारी (ता. ३० व ३१) ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन व कार्याचे २१व्या शतकातील महत्त्व आणि समयोचितता’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकात पाटील आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन आज सकाळी ११ वाजता होणार आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.

या वेळी इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील नव्या सभागृहाचे उद्घाटन; तसेच, विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवानिमित्त विशेष टपालतिकिटाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवानिमित्त उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आंतरविद्याशाखीय व बहुभाषिक राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
Agriculture Technology : बहुपयोगी शेती संयंत्राला मिळाले पेटंट

विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, तत्त्वज्ञान विभाग व बहिःशाल शिक्षण मंडळ, भारत इतिहास संशोधक मंडळ, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठ यांनी परिषदेतील विविध सत्रे व विशेष व्याख्यानांचे नियोजन केले आहे.

राष्ट्रीय परिषदेमध्ये भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ विचारवंत व अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे राष्ट्रीय परिषदेची भूमिका मांडणारे बीजभाषण होईल. डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद पांडे, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त), व्हाइस अॅडमिरल मुरलीधर पवार (निवृत्त), एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आदी मान्यवर या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली.

Chhatrapati Shivaji Maharaj
Agriculture Irrigation Subsidy : बुलडाणा जिल्ह्यात ठिबक, ‘तुषार’चे ७२ कोटी थकले

परिषदेचा समारोप शनिवारी ४.०० वाजता होणार असून, केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर उपस्थितांना मार्गदर्शन करतील. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत अध्यक्षस्थानी असणार आहेत.

देशभरातून ७५ शोधनिबंध

राष्ट्रीय परिषदेसाठी देशभरातून व राज्यातून ७५ शोधनिबंधांची नोंदणी झाली असून, त्यांच्या सादरीकरणासाठी नऊ समांतर सत्रे होणार आहेत. पांडुरंग बलकवडे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टक्रांती या विषयावर भाषण होणार असून, त्याच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल निंभोरकर असतील.

तसेच, विक्रमसिंह मोहिते यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यनीती आणि डॉ. केदार फाळके यांचे शिवकालीन कागदपत्रांच्या अभ्यासाची पद्धती या विषयांवर भाषणे होणार आहेत. त्यांचे अध्यक्षस्थान श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे भूषविणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com