Panaji News: कल्पवृक्ष म्हणून नारळाचे स्थान अबाधित आहे. आरोग्यदायी नारळ पाण्याबरोबरच सण- समारंभांत खाद्य पदार्थांच्या निर्मितीसाठी वर्षभर बाजारपेठेत नारळाची मागणी टिकून असते. परंतु गेल्या काही वर्षांपासून गोव्यासह महाराष्ट्रातील कोकण आणि दक्षिण भारतातील किनारपट्टीवरील नारळ उत्पादक आणि प्रक्रिया उद्योजक अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. .त्यावर विचारमंथन करून उपाय सुचविण्यासाठी दैनिक ‘गोमंतक’च्या पुढाकाराने आणि ‘ॲग्रोवन’च्या सहकार्याने पणजी येथे १० ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रीय नारळ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे..परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कृषिमंत्री रवी नाईक, महाराष्ट्राचे फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आणि दक्षिण भारतातील नारळ उत्पादक राज्यांचे कृषिमंत्री उपस्थित राहणार आहेत..Sugar Conference: राज्यस्तरीय साखर परिषदेचे पुण्यात उद्या आयोजन.देशातील नारळ उत्पादकांच्या समस्या लक्षात घेता या एकदिवसीय राष्ट्रीय नारळ परिषदेमध्ये राज्यांतील घटणारे नारळ उत्पादन, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, प्रक्रिया उद्योगाबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. याचबरोबरीने पर्यटन आणि प्रक्रिया उद्योगातील संधी लक्षात घेऊन या परिषदेच्या माध्यमातून नारळ उत्पादनवाढ, प्रक्रिया उद्योगांची उभारणी, देश-परदेशातील बाजारपेठ, स्टार्टअप, शेतकरी उत्पादक कंपन्यांना गती देण्याचा प्रयत्न आहे. याबाबत कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ, तसेच प्रक्रिया उद्योगातील जाणकार मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय नारळ बोर्ड, कृषी विभागाच्या विविध योजनांबाबतही माहिती मिळणार आहे..65th Annual Conference: द्राक्ष बागायतदार संघाचे रविवारपासून अधिवेशन.उपयुक्त नारळ पीकजागतिक पातळीवर नारळ उत्पादनात भारताचा वाटा ३१ टक्के आहे. देशाचा विचार करता दक्षिणेकडील राज्यांच्या बरोबरीने महाराष्ट्र, गोवा राज्यामध्ये नारळ लागवड मोठ्या प्रमाणात आहे. सध्या उत्पादनामध्ये कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. दक्षिणेकडील राज्यांमध्ये पर्यटन आणि लघू उद्योगासाठी नारळ हे महत्त्वाचे पीक झाले आहे. मिठाई, चॉकलेट, तेल, काथ्या निर्मितीच्या बरोबरीने जागतिक बाजारपेठेत नारळ वाइन, व्हर्जिन कोकोनट ऑईल, साखर, करवंटी कोळसा,ॲक्टिव्हेटेड कार्बन निर्मितीमध्येही चांगल्या संधी तयार झाल्या आहेत..परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठीपरिषदेमध्ये नारळ उत्पादक शेतकरी, कृषी विद्यार्थी तसेच अभ्यासक सहभागी होऊ शकतात. परिषदेतील सहभाग मोफत असला तरी मोजक्याच जागा असल्याने इच्छुकांनी २ ऑक्टोबरपर्यंत पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर निवड झालेल्यांना ‘गोमंतक’च्या वतीने परिषदेतील सहभाग निश्चितीविषयी कळविले जाईल. निवड झालेल्यांनी प्रवासखर्च स्वतः करावयाचा आहे. नोंदणी करण्यासाठी शेजारी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून आवश्यक माहिती भरावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.