Crop Damage: नाशिक तालुक्यातील सिद्ध पिंप्री या द्राक्षासाठी प्रसिद्ध गावात प्रचंड पावसामुळे ६५० हेक्टर द्राक्षबागा निष्प्रभ ठरल्या आहेत. या संकटामुळे सुमारे २०० हेक्टर बागांवर शेतकऱ्यांनी स्वतःच कुऱ्हाड चालवली असून, एकाच गावात द्राक्ष पिकावरील हे नैराश्य चिंताजनक ठरत आहे.