Subsidy to Onion Producers : कांदा उत्पादकांना देण्यात येणाऱ्या अनुदानात नाशिक, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक रक्कम वितरित करण्यात येणार आहे. मात्र, मागणीच्या केवळ ५३ टक्के रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याने या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना काही काळ वाट पहावी लागेल. उर्वरित १३ जिल्ह्यांतील कमी रक्कम या अनुदानातून प्रथम दिली जाईल.
राज्य सरकारने अटी-शर्थी शिथिल केल्याने पणन विभागाकडे अर्ज येण्याचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे पणन विभागाची कसोटी लागणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ४३५ कोटी ६१ लाख, सोलापूरसाठी १०१ कोटी १६ लाख तर नगरसाठी १०२ कोटी ७९ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. शेतकऱ्यांना २०० क्विंटलच्या मर्यादेत ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर करण्यात आले आहे. बदललेल्या निकषांमुळे जवळपास ट्रकभर कागदपत्रे पुण्यातील पणन संचालक कार्यालयात आल्याचे ‘पणन’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
३० एप्रिलपर्यंत राज्यातील ४ लाख १३ हजार ८३ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. ३ लाख ३६ हजार ४७६ शेतकऱ्यांचे अर्ज पात्र केले होते. मात्र, अटी काढून टाकत केवळ कांदा विक्रीची अट ठेवल्याने अर्जांचा ओघ अजूनही सुरू आहे. परिणामी अजूनही पणन विभाग अर्जांची छाननी करत आहे. त्यामुळे १९ ऑगस्टपर्यंत ८४४ कोटी ५६ लाख ८ हजार १७७ रुपयांचे अनुदान निश्चित केले आहे.
पणन विभागाने शेतकऱ्यांचा बचत बँक खाते क्रमांक विकसित केलेल्या प्रणालीवर नोंद केला आहे. एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होईल. यासाठी चाचणी घेतली जाईल. प्रथम काही खातेदारांच्या खात्यावर १ रुपया पाठवून खात्री करून घेतली जाईल. त्यानंतर रक्कम वितरित केली जाईल.
नाशिक : ४३६ कोटी ६१ लाख २३ हजार ५७८
धाराशीव : २२ कोटी ८८ लाख, ६४ हजार ७९६
पुणे : ६६ कोटी, ८९ लाख ६हजार ६९८
रायगड : ६८ लाख १६ हजार ६३१
सांगली : ७ कोटी, ९९ लाख, १२ हजार, ८६८
सातारा : ३ कोटी, ३८ लाख ६ हजार ३०८
सोलापूर : १०१ कोटी १६ लाख ७१ हजार ४४८
ठाणे : १ कोटी, ४६ लाख ३९ हजार ८४५
नगर : १०२ कोटी ७९ लाख, ३६ हजार ९१७
छत्रपती संभाजीनगर : २० कोटी ८५ लाख, ९ हजार ९१७
अमरावती : ३३ लाख, ९२ हजार ६०८
बुलडाणा : ३३ लाख, ९२ हजार, ६०८
चंद्रपूर : १० कोटी, २४ लाख २१ हजार ६७६
धुळे : १२ कोटी, ६२ लाख, ६८ हजार, २९६
जळगाव : २३ कोटी, १६ लाख, १७ हजार ७५३
कोल्हापूर : १३ कोटी, ४३ लाख ६७ हजार४५०
बीड : २२ कोटी, ५३ लाख, ६२ हजार ९४५
वर्धा : ५ लाख ८४ हजार ६९२
नांदेड : १ कोटी १३ लाख ८१ हजार, १३
लातूर : १ कोटी १३ लाख ८१ हजार, १३
यवतमाळ : ५ लाख ६३ हजार, ७०७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.