Government Policy Issue: राज्य सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊन सातबारा कोरा करण्याचे निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले होते. मात्र सरकारने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत नाशिक जिल्ह्यातील तब्बल ५६ हजार कर्जदार शेतकरी १ जुलै रोजी शेणामातीचा दिवा लावून दिवाळखोरी जाहीर करणार असल्याची माहिती शेतकरी संघटना समन्वय समितीचे समन्वयक भगवान बोराडे यांनी दिली. .बोराडे म्हणाले, ‘‘गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी कर्जमुक्तीसाठी विविध आंदोलने करत आहेत. मात्र सरकारने त्याची गंभीर दखल घेतलेली नाही. शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने, सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे..Agriculture Crisis: शेतीला गरज सर्वंकष पुनर्रचनेची! .त्यातच अवकाळी पाऊस, नैसर्गिक संकटे आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी १ जुलै रोजी जिल्हा बँक व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेणामातीचा दिवा लावून ‘आमचे दिवाळे निघाले, आम्ही नादार झालो,’ अशी घोषणा देत प्रतीकात्मक दिवाळखोरी जाहीर करणार आहेत. तसेच यापुढे कोणत्याही बँकेने कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात येऊ नये, असा इशाराही या आंदोलनातून दिला जाणार आहे..Farmer Crisis: खरीप हंगामावर रोकड टंचाईचे नवे संकट.या आंदोलनात शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील, अजित नवले, देविदास पवार, बिंदू शर्मा, दीपक पगार, साखरचंद कांकरिया, भरत दिघोळे, राजू देसले, नाना बच्छाव, निवृत्ती गारे, सुधाकर मोगल, तुषार गांगुर्डे, अर्जुन बोराडे यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. समितीचे समन्वयक बोराडे, आदिवासी विकास सहकारी संस्थेचे राज्याध्यक्ष कैलास बोरसे, दिलीप पाटील, मोती नाना पाटील, खेमराज कोर यांनी जिल्ह्यातील शेतकरी नेते व कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे..शेतकरी का लावणार शेणामातीचा दिवा?भारतीय परंपरेनुसार एखादा व्यापारी, उद्योजक किंवा सावकार कर्ज फेडू शकत नसल्यास गाई-बैलांच्या शेणामातीचा दिवा लावून गावात दवंडी देत दिवाळखोरी जाहीर करत असे. त्याच पारंपरिक पद्धतीचा आधार घेत शेतकरी आता आपल्या आर्थिक संकटाकडे सरकारचे लक्ष वेधणार आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.