Maharashtra Politics: महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अनपेक्षित पराभव करत दणदणीत विजय मिळवला.गिते यांनी पहिल्याच फेरीत ३५७ मते मिळवून विजयासाठी आवश्यक असलेला ३०३ मतांचा कोटा पूर्ण केला. तर दराडे यांना अवघ्या २४८ मतांवर समाधान मानावे लागले.तिसरे उमेदवार प्रसाद हिरे यांना एकही मत मिळाले नाही..या निवडणुकीत एकूण ६१९ पैकी ६१८ मतदारांनी मतदान केले होते.त्यापैकी १३ मते अवैध ठरल्याने ६०५ वैध मतांच्या आधारे निकाल घोषित करण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निरीक्षक मिलिंद शंभरकर आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत ही मतमोजणी पार पडली..Legislative Council Voting Percentage: सांगली - सातारा विधान परिषदेसाठी ९९.८९ टक्के मतदान.निवडणुकीत भाजपमधील बंडखोरी हा अत्यंत कळीचा मुद्दा ठरला. गोकुळ गिते हे नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांचे बंधू असून,ते अप्रत्यक्षपणे भाजपशी संबंधित होते. त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये अनेक बैठका घेतल्या. दुसऱ्या बाजूला भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला, मात्र गिते निवडणुकीच्या रिंगणात ठाम राहिले. महायुतीतील अंतर्गत गटबाजी आणि नाराजीचा फटका उमेदवार नरेंद्र दराडे यांना बसला. .Legislative Council Election: निवडणूक संपली; महायुतीची धाकधूक कायम.उमेदवारीवरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील स्थानिक नेते नाराज होते. याच परिस्थितीचा फायदा घेत अपक्ष उमेदवार गिते यांनी प्रभावी रणनीती आखत महायुतीच्या मतांमध्ये मोठे खिंडार पाडले आणि विजय मिळवला. राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चेनुसार, संख्याबळ अनुकूल असतानाही दराडे यांचा झालेला पराभव हा महायुतीमधील अंतर्गत फुटीचा परिणाम आहे. महायुतीमधील विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गट काही प्रमुख नेत्यांनी आणि सदस्यांनी गोकुळ गिते यांना छुप्या पद्धतीने मोठी मदत केल्याची आणि ‘क्रॉस मतदान’ घडवून आणल्याची जोरदार चर्चा आहे..‘माझा विश्वासघात झाला’ : नरेंद्र दराडेपराभवानंतर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. ‘माझा विश्वासघात झाला,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.त्यांनी महायुती आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांकडे रोख ठेवत कोणाचेही नाव न घेता आपला संताप व्यक्त केला. त्यास दराडे यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांनीही नाशिकमधील मतफुटीवर संताप वक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.