Crop Loan : नाशिक जिल्हा बँकेचा पीक कर्जवाटप हंगाम एप्रिलपासून सुरू

Nashik DCC Bank : जिल्हा बँकेच्या १०५१ विविध कार्यकारी सहकारी संस्था सभासद असून, त्यामार्फत शेतकरी सभासदांना पीक कर्जवाटप होत असते. एप्रिल २०२५ पासून खरीप पीक कर्जवाटपचा हंगाम सुरू होत आहे.
Nashik DCC Bank
Nashik DCC Bank Agrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्हा बँकेच्या १०५१ विविध कार्यकारी सहकारी संस्था सभासद असून, त्यामार्फत शेतकरी सभासदांना पीक कर्जवाटप होत असते. एप्रिल २०२५ पासून खरीप पीक कर्जवाटपचा हंगाम सुरू होत आहे. बँकेस बहुतांश विविध कार्यकारी संस्थेची कमाल मर्यादा पत्रके प्राप्त झालेले असून संस्थाची कमाल मर्यादापत्रके केंद्र कार्यालयातून मंजूर करून संबंधित शाखेत पाठविली आहेत.

उर्वरित संस्थाची कमाल मर्यादापत्रके ३१ मार्चपर्यंत मंजुरी देण्याचे नियोजन बँकेने केलेले आहे. सुट्टीच्या दिवशी देखील कमाल मर्यादा पत्रके मंजुरीचे कामकाज सुरु राहणार आहे. जिल्हा बँक गत हंगाम सन २०२४-२५ खरीप पीककर्जासाठी दिलेला लक्ष्यांक पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला असून, जिल्हा बँकेने ४२ हजार सभासदांना रक्कम ४१४ कोटीचे पीक कर्जवाटप केलेले आहे.

लक्षांकाच्या ६६ टक्के पीक कर्जवाटप केलेले आहे. तरी शेतकरी सभासदांनी सन २०२४-२५ हंगामात घेतलेल्या पीककर्जाचा ३१ मार्च २०२५ पूर्वी कर्ज भरणा करावा, नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या सभासदास एप्रिलमध्ये त्वरित नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्यास बँक कटिबद्ध आहे, असे कळविण्यात आले आहे.

Nashik DCC Bank
Crop Loan Distribution : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरण रखडत

सन २०२५-२६ हंगामात पीक कर्ज उचल करण्यास पात्र होऊन शासनाच्या ३.०० लाखांपर्यंतच्या पीक कर्जास शून्य टक्का व्याजाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी त्वरित जुने कर्ज भरणा करून नवीन शून्य टक्के व्याज सवलतीचे पीक कर्ज उचल करावे व शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा.

Nashik DCC Bank
Crop Loan Target : दोन हजार चारशे कोटींचे पीककर्ज

कर्जदार सभासदांसाठी संबंधित विविध कार्यकारी संस्थेत/शाखेत हिशेब मिळण्याची सुविधा केलेली आहे. ३० व ३१ मार्च २०२५ या सुट्टीच्या दिवशीही बँकेच्या शाखेत कर्जवसुलीचे कामकाज सुरू राहणार आहे.तरी सर्व सभासदांनी ३१ मार्च अखेर पीककर्जाचा भरणा करून सन २०२५-२६ हंगामासाठी नवीन पीककर्ज वाटपास पात्र व्हावे असे बँकेच्यावतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

सामोपचार कर्जफेड योजनेचा लाभ घ्यावा

बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२४-२५लागू केलेली असून पीककर्जासाठी ८ व मध्य मुदत कर्जासाठी १० टक्के व्याज आकारून योजनेस पात्र असलेले सर्व प्रकारचे शेती व शेतीपूरक (अल्पमुदत, मध्यम मुदत, दीर्घमुदत संपूर्ण येणे कर्ज व बँकेमार्फत वितरित केलेल्या थेट कर्ज पुरवठा योजनेअंतर्गत थकित झालेले सर्व थकबाकीदार सभासद या योजनेस पात्र आहेत. जास्तीत जास्त थकबाकीदार सभासदांनी सामोपचार कर्जफेड योजनेचा लाभ घ्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com