Crop Loss: राज्यातील अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, अशी मागणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासदांनी केली. सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला असून राज्य शासनाकडे तातडीने पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.