Nashik News: नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आठ वर्षांनंतर पार पडली. सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी गुरुवारी (ता. १५) सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. १२२ जागांसाठी सकाळी ७:३० ते दुपारी ३:३० या पहिल्या ८ तासांच्या कालावधीत नाशिकमध्ये एकूण ३९.६४ टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती महापालिका निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली..सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदानाचा वेग संथ होता. ३१ प्रभागांमधील १२२ जागांसाठी १,५६३ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडली. नाशिकमध्ये १३ लाख ६० हजार ७२२ मतदार आहे. यात ६ लाख ५६ हजार ६७५ महिला आणि ७ लाख ३ हजार ९६८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. तर तृतीयपंथी ७९ मतदार आहेत त्यापैकी दुपारी ३.३० पर्यंत ५ लाख ३९ हजार ३४२ मतदारांनी हक्क बजावला. ३१ प्रभागांमध्ये ५० टक्क्यांहून कमी मतदान होते. संध्याकाळी ५:३० पर्यंत मतदानाची अंतिम टक्केवारी वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली होती..Local Body Election: गोंधळात मतांचा टक्का घसरण्याची भीती.भाजपने स्वबळावर नारा दिला. तर शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) व रिपब्लिकन सेना एकत्र लढले. तर शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्रितपणे निवडणूक लढविली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष स्वतंत्र तर कुठे सोबत होते. या शहरातील काही संवेदनशील केंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही ठिकाणी पैसे वाटप करण्याच्या प्रकारावरून तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला..अनेक ठिकाणी उमेदवारांचे कार्यकर्ते मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी धावपळ करत होते. एका केंद्रावर एका चिन्हावर मतदान केल्यावर दुसरे चिन्ह दिसत असल्याचा दावा उमेदवारांकडून करण्यात आला. या आरोपांनंतर लेखी तक्रारी दाखल केल्या असून मतदान केंद्रावर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी शिवसेनेच्या उमेदवारांनी गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यंदा प्रथमच मतदान करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘डिजिटल प्रमाणपत्र’ देण्याचा उपक्रम राबविण्यात आला..Local Body Election: गोंधळात मतांचा टक्का घसरण्याची भीती.मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी ३.३० पर्यंत ४६.१८ टक्के मतदान झाले. नाशिक व मालेगावमध्ये ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने काही ठिकाणी मतदान केंद्रावर सकाळी बराच वेळ मतदान सुरू होऊ शकले नाही. बिघाड तातडीने दूर झाल्यानंतर काही ठिकाणी मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली..आज निकाल२०१७ मध्ये भाजपने नाशिक महापालिकेवर पूर्ण बहुमत मिळवले होते. मात्र मुदत २०२२ मध्ये संपल्यानंतर निवडणूक रखडली होती. निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (ता. १६) होणार असून संपूर्ण शहराचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने नाशिकमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. भाजपाने अनेकांची तिकिटे कापल्याने अनेक अपक्षांनी शड्डू ठोकला. याशिवाय डावे पक्ष, आम आदमी पक्ष, अपक्षही काही प्रभागांत रिंगणात होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.