ठळक मुद्देकर्नाटक सहकारी दूध उत्पादक संघ फेडरेशनकडून 'नंदिनी' दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरात कपाततूप, बटर, पनीर, आईस्क्रिम आता कमी दरात मिळणारजीएसटी कपातीनंतर दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत बदल.Nandini Milk Products : सोमवारपासून (दि.२२ सप्टेंबर) जीएसटी (GST) कमी झाल्यामुळे कर्नाटक सहकारी दूध उत्पादक संघ फेडरेशनने 'नंदिनी' दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरात कपात केली. यामुळे त्यांचे तूप, बटर, पनीर, आइस्क्रीम हे दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांना कमी दरात मिळतील..कर्नाटक मिल्क फेडरेशन (KMF) ने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटीत कपात केल्यामुळे 'नंदिनी' दुग्धजन्य पदार्थांच्या दरात बदल केला आहे..Milk Prices: मदर डेअरीने दूध, बटरसह उत्पादनांचे भाव कमी केले; जीएसटी घटल्याचा ग्राहकांना फायदा ."केंद्र सरकारने तूप, पनीर, चीज, आइस्क्रीम, चॉकलेट आदी उत्पादनांवरील जीएसटी कमी केला आहे. ही कपात २२ सप्टेंबरपासून लागू झाली. त्यानुसार, कर्नाटक मिल्क फेडरेशनने 'नंदिनी' दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री किमतीत सुधारणा केली आहे," असे त्यात नमूद केले आहे..Amul Dairy Industry: ‘अमूल’चा आदर्श.असे आहे सुधारित दरयानुसार, १ लिटर (1000 ml) तुपाच्या पिशवीचा दर पूर्वी ६५० रुपये होता; ती आता ६१० रुपयांना मिळेल. ५०० ग्रॅम बटर (अनसॉल्टेड) चा दर ३०५ रुपयांवरुन २८६ रुपयांपर्यंत खाली आणला आहे. एक किलो पनीरचा (१ हजार ग्रॅम) दर ४२५ रुपयांवरुन ४०८ रुपये, एक लिटर गुडलाइफ मिल्क (१ हजार मिली) ७० रुपयांवरुन ६८ रुपये, एक किलो प्रोसेस्ड चीजचा दर ५३० रुपयांवरुन ४९७ रुपये, एक किलो चीज- मोझारेलाचा दर ४८० रुपयांवरुन ४५० रुपयांवर आणण्यात आला आहे..आईस्क्रीमही झाले स्वस्तयाशिवाय, एक किलो (1000 ml) व्हॅनिला टब आइस्क्रीमचा दर २०० रुपयांवरून १७८ रुपये करण्यात आला आहे. १८० ग्रॅम सेव्होरीजचा दर ६० रुपये होता. तो आता ५६ रुपये केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.