Monsoon Impacts: नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या असल्या तरी समाधानकारक पाऊस अद्यापही झालेला नाही. अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत असले, तरी जोरदार पावसाऐवजी केवळ भूरभुरीवरच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे. परिणामी पावसाच्या भरवशावर केलेली पेरणी धोक्यात आली असून उगवलेल्या पिकांच्या वाढीवरही विपरीत परिणाम दिसून येत आहे..नांदेड जिल्ह्यात यंदा ७ लाख ६१ हजार ५७४ हेक्टर सर्वसाधारण खरीप पेरणी क्षेत्र असून, त्यापैकी ५ लाख ४७ हजार ७२१ हेक्टर, म्हणजेच ८२.९५ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जूनच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या उरकल्या. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने आता पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. .Rainfall Deficit: जूनमध्ये पावसाची ६० टक्के तूट.हवामान विभागाच्या सरासरीनुसार जिल्ह्यात आजपर्यंत २१८.४० मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात मात्र केवळ १६८.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तब्बल ५० मिलिमीटर पावसाची तूट निर्माण झाली आहे. ही तूट दिवसेंदिवस वाढत असल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी यांसह विविध पिकांची उगवण झालेली आहे..Nashik Weather Update: नाशिक जिल्ह्यात पावसाची ओढ कायम.मात्र पावसाअभावी जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटल्याचे चित्र आहे. हलक्या जमिनीतील पिकांमध्ये कोमेजण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी जोरदार वाऱ्यामुळे ढग स्थिर राहत नाहीत. .त्यामुळे अनेक भागांत केवळ रिमझिम किंवा भूरभुरी होत असून शेतजमिनीत आवश्यक ओलावा निर्माण होत नाही. दिवसाचे तापमानही वाढत असल्याने जमिनीतील आर्द्रता कमी होत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपलब्ध ओलाव्याचे संवर्धन करण्याचा सल्ला दिला आहे..हंगामाचे भवितव्य आठवडाभरातील पावसावरचजिल्ह्यात पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास खरीप पिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र पावसाने आणखी विलंब केल्यास उभ्या पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता असून खरीप हंगामाचे भवितव्य येत्या आठवडाभरातील पावसावरच अवलंबून राहणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.