Nanded News : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भविलेल्या पूरपरिस्थितीमुळे तब्बल एक हजार ५३६ गावांतील सात लाख ९ हजार ७६६ शेतकरी बाधित झाले आहेत. १४ ऑगस्टपासून आजपर्यंत सहा लाख २० हजार ५६६ हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनाने प्राथमिक आकडेवारी जाहीर केली आहे..नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. नुकसानीचे अंतिम क्षेत्र पंचनाम्यानंतरच कळेल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात १४ ते १८ ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे सव्वातीन लाख हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले होते. यात सहा नागरिकांसह शेकडो जनावरांचा मृत्यू झाला होता. .Rain Crop Damage : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान.या जखमा ताज्या असताना जिल्ह्यात पुन्हा २८ आणि २९ ऑगस्टला पुन्हा अतिवृष्टीने तडाखा दिला. या काळात पहिल्या दिवशी १७ तर दुसऱ्या दिवशी तब्बल ६९ मंडलांत अतिवृष्टी झाली. या काळात १३ मंडलांत, तर २०० मिलिमीटरवर, तर ३० मंडलांत १०० मिलिमीटरवर पाऊस झाला. परिणामी, जिल्ह्यातील लहान-मोठ्या नाल्यांसह प्रमुख नद्यांना पूर आला. यामुळे नदीकाठचे पिके वाहून गेली. .चार नागरिकांसह अनेक जनावरांचा मृत्यू झाला. पुरामुळे नुकसानीची तीव्रता अधिक होती. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने हजारो कुटुंबे उघड्यावर पडले. जिल्हा प्रशासनाने बचाव कार्य तातडीने हाती घेऊन अनेकांची पुरातून सुटका केली. जिल्ह्याचे पालकमंत्री तातडीने जिल्ह्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नुकसानीबाबत तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले..शासकीय यंत्रणांनी केलेल्या प्राथमिक पाहणीत जिल्ह्यात सहा लाख १३ हजार ४४१ हेक्टर जिरायती, सहा हजार ४६२ हेक्टर बागायती तर ६६३ हेक्टर फळपिकांचे क्षेत्र नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. या काळात रस्ते, वीज, घरे, जनावरे, सार्वजनिक मालमत्ता यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..Wet Drought Nanded : नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा .५२.१५ टक्के क्षेत्राचे पंचमाने पूर्णजिल्हा प्रशासनाकडून बाधित १५३६ गावांमध्ये पंचनाम्याचे काम सुरू आहे. आजपर्यंत तीन लाख ४५ हजार ६०६ शेतकऱ्यांच्या तीन लाख २३ हजार ६३१ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेती क्षेत्रापैकी ५२.१५ टक्के क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे..तालुकानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)तालुका..........बाधित क्षेत्रअर्धापूर..........१९,९१५नांदेड............१८,५३२मुदखेड...........२१,८९४कंधार............६०,४६१लोहा.............६७,५०१मुखेड.............७१,०७७देगलूर............४९,१६२बिलोली..........३६,९८९धर्माबाद..........२५,६८७नायगाव..........३४,४०९किनवट...........५२,८११माहूर.............१७,२८३हदगाव...........५६,०८७हिमायतनगर.....३०,१३९भोकर.............३७,५०२उमरी...........२१,११७एकूण...........६,२०,५६६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.