
Nanded News : वातावरण बदलामुळे संकटात शेती अडकल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याचे संरक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलात आणली. परंतु राज्य शासनाने प्रचलित पीक विमा योजनेत बदल करून शेतकऱ्यांना सर्वाधीक परतावा मिळणारे जोखीम घटकच रद्द केल्यामुळे राज्य शासन पीक विमा योजनाच बंद करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांना खरिपातील पिकांना विम्याचे संरक्षण देता येत होते. एक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत भरपाईसाठी दावा दाखल करता येत होता. जिल्हास्तरीय पीकविमा योजनेचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकातर्गत शेतकऱ्यांना त्या काळात झालेल्या नुकसानीच्या २५ टक्के भरपाई अग्रिम स्वरूपात मंजूर करण्याचे अधिकारी होते.
शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्यानंतर ७२ तासांच्या आत विमा कंपनीला कळवून विमा भरपाईसाठी दावा दाखल करता येत होता. या घटकातून शेतकऱ्यांना सर्वाधीक भरपाई मिळत होती. परंतु शासनाने नुकतीच नवीन पीकविमा योजनेला मंजूर देवून यातून शेतकऱ्यांना सर्वाधीक परतावा मिळवून देणारे घटकच रद्द केल्यामुळे सरकारला पीकविमा योजनाच बंद करण्याची आहे, अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
नांदेडला पाच वर्षांत मिळालेला विमा परतावा
खरीप हंगामात २०२० ते २०२४ या कालावधीत शेतकऱ्यांना पिक विमा योजनेंतर्गत एक हजार ८४४ कोटींची भरपाई मिळाली. २०२० मध्ये एकूण विमा भरपाई ९६.१९ कोटी मिळाली. यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती ७६.५३ कोटी, उत्पादनावर आधारित नुकसान १९.०४ कोटींचा परतावा ८२ हजार २४७ शेतकऱ्यांना मिळाला.
२०२१ मध्ये एकूण विमा भरपाई ५२१.७ कोटी मिळाली. यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती ४४८.६६ कोटी, उत्पादन व हवामानावर आधारित नुकसान ७३.०३ कोटी रुपये परतावा ४ लाख १५ हजार शेतकऱ्यांना मिळाला.
२०२२ मध्ये एकूण विमा भरपाई ५०२.७ कोटी रुपये मिळाला. यात हंगामातील प्रतिकूल परिस्थिती ३६६.४१ कोटी, स्थानिक आपत्ती १०१.८९ कोटींचा परतावा ५ लाख १४ हजार ८५१ शेतकऱ्यांना मिळाला.
२०२३ मध्ये एकूण विमा भरपाई ४६५.८ कोटी रुपये मिळाला. यात हंगामातील प्रतिकूल परिस्थिती २९४.६५ कोटी, स्थानिक आपत्ती १६६.७९ कोटींचा परतावा ५ लाख ४७ हजार २२३ शेतकऱ्यांना मिळाला.
२०२४ मध्ये एकूण विमा भरपाई २५८ कोटी रुपये मिळाली. यात हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकानुसार २५८ कोटींचा परतावा ९ लाख ५५ हजार ५६२ रुपये मिळाला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.