Pune News: नांदेड जिल्ह्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकरी ५० हजार रुपये मदत द्यावी आणि शेतमजुरांना प्रति कुटुंब ३० हजार रुपये श्रम नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करत अखिल भारतीय किसान सभा, सिटू व शेतमजूर युनियन यांनी आज (ता. १०) किनवट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा आयोजित केला. यावेळी सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजच्या शासन निर्णयाची होळी करून नांदेड जिल्ह्यास तातडीने शासन निर्णयात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी झेनित दोनतुल्ला यांना दिले..या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अर्जुन आडे, सहसचिव कॉ. शंकर सिडाम, रा.क.स. किसान सभेचे कॉ. किशोर पवार आणि कामगार नेते कॉ. जनार्धन काळे यांनी केले. मोर्च्याची सुरुवात किनवट रेल्वेस्टेशनपासून झाली. मोर्च्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार व महिलाही सहभागी होत्या..Farmer Demand: शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत करा; संभाजी ब्रिगेड.किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अर्जुन आडे म्हणाले की, "गेल्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असूनही राज्य सरकारने फक्त गुंठा प्रति ८५ रुपये मदत जाहीर केली आहे, ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे." असे ते म्हणाले..मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीसाठी जाहीर केलेल्या ३१ हजार कोटींच्या विशेष पॅकेजमध्ये नांदेड जिल्हा वगळल्यामुळे शेतकऱ्यांत संताप वाढला आहे. पंजाब आणि कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये एकरी ५० हजार रुपये मदत मिळत असताना महाराष्ट्रात तुटपुंजी मदत देत शेतकऱ्यांची खिल्ली उडवली जात असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे..Farmer Protest: ‘शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या’.यावेळी कॉ. अमोल आडे, डॉ. बाबा डाखोरे, संजय मानकर , इरफान पठाण, खंडेराव कानडे, आडेलु बोनगीर, शेषेराव ढोले, , शैलया आडे, मनोज सल्लावार, इंदल राठोड, राजकुमार पडलवार, विजय जाधव, सीताराम आडे, रंगराव चव्हाण, मोहन जाधव, दिगंबर आगीरकर, शे. चांद, बाबा फरीद, अंबर चव्हाण, चंपाती पोत्रे यांच्यासह शेतकरी - शेतमजूर मोठ्या संख्याने उपस्थित होते..शेतकऱ्यांच्या मागण्याओला दुष्काळ तत्काळ जाहीर करावाअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत द्यावीशेतकरी व शेतमजुरांची संपूर्ण कर्जमुक्ती करावीशेतमजुरांना प्रति कुटुंब ३० हजार रुपये श्रम नुकसानभरपाई द्यावीसर्व पिकांना १०० टक्के विमा संरक्षण देऊन सरसकट परतावा वाटावापशुधन नुकसानीसाठी ८० हजार रुपये मदत जाहीर करावीसर्व योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावेरोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना ८०० रुपये मजुरीसह काम द्यावेअतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या जमिनींसाठी बाजारभावानुसार मोबदला द्यावाविद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक फी माफ कराव्यातकिनवट शहरातील पुरग्रस्तांना प्रति घर २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.