DAP Fertilizer: आगामी खरीप हंगाम २०२६ लक्षात घेऊन जिल्ह्यात डीएपी व युरिया खताचा एकूण ७ हजार ४५० टन संरक्षित साठा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५ हजार ८५० टन युरिया आणि १ हजार ६०० टन डीएपी खताचा समावेश आहे..महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ आणि महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन या दोन नोडल एजन्सीमार्फत खत साठवणूक व पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून, आतापर्यंत या दोन्ही संस्थांकडे मिळून ३ हजार ७४५ टन खताचा संरक्षित साठा उपलब्ध झाला आहे..Kharif Fertilizer Stock : देशात खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा; शेतकऱ्यांना टंचाईचा सामना करावा लागणार नाही, केंद्र सरकारचा दावा .खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांकडून खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. पेरणीपूर्व मशागत तसेच कपाशी, सोयाबीन, तूर आणि मका पिकांच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर डीएपी व युरियाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने आगाऊ नियोजन सुरू केले आहे..Fertilizer Stock: बुलडाण्यात खरिपासाठी १.७ लाख टन खतसाठा उपलब्ध.उपलब्ध आकडेवारीनुसार, युरियासाठी एकूण ५ हजार ८५० टन साठ्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ३ हजार १८७ टन साठा उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळकडे ३ हजार टन उद्दिष्टापैकी १ हजार ८०९ टन साठा जमा झाला असून, महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशनकडे २ हजार ८५० टन उद्दिष्टापैकी १ हजार ३७८ टन साठा उपलब्ध झाला आहे. डीएपी खतासाठी एकूण १ हजार ६०० टन साठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळकडे १ हजार ३०० टन उद्दिष्ट असून, त्यापैकी २७५ टन साठा उपलब्ध झाला आहे. तर महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशनकडे ३०० टन उद्दिष्टापैकी २७९ टन साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे डीएपीचा एकूण उपलब्ध साठा ५५८ टनांवर पोहोचला आहे..दोन्ही खतांचा मिळून आतापर्यंत ३ हजार ७४५ टन साठा उपलब्ध झाला असला, तरी उद्दिष्टाच्या तुलनेत अजून मोठ्या प्रमाणावर साठा उभारणे बाकी आहे. आगामी काळात जिल्ह्याला मिळणाऱ्या खत पुरवठ्यातून हा साठा वाढविण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली..अधिकृत विक्रेत्याकडूनच खत खरेदीचे आवाहनजिल्ह्यात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, जादा दराने खतविक्री होऊ नये तसेच शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने निरीक्षण वाढविले आहे. अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडूनच खत खरेदी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. खत विक्रीत अनियमितता, कृत्रिम टंचाई निर्माण करणे किंवा जादा दर आकारणी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.