Nana Patekar Work For Maharashtra Farmers: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी आज (दि. ८ ऑक्टोबर) तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गोव्यातील दोनापावला येथील त्यांच्या निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना पहाटे ४.३० वाजता तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यांना पहाटे ५.३० वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे..अभिनेते नाना पाटेकर यांचे मराठी नाटकासह मराठी, हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदान पाहता त्यांच्यावर 'शासकीय इतमामात' अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली. .नाना पाटेकर यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच रंगभूमी गाजवली. त्याचबरोबर त्यांनी प्रखर सामाजिक जाणिवा जपल्या. 'नाम फाऊंडेशन'च्या माध्यमातून त्यांनी शतेकऱ्यांना मदतीचा हात दिला. त्यांनी जलयुक्त शिवार अभियानाला पाठिंबा दिला. त्यासाठी त्यांनी स्वतः शिवारात जाऊन काम केले. ते महाराष्ट्रातील सध्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणीही करणार होते. पण त्यापूर्वीच ते अचानक सोडून गेले आहेत. .Nana Patekar Death: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.नानांची ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी- मुख्यमंत्री फडणवीस नानांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. एक सिद्धहस्त कलावंत, मार्गदर्शक आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. ''ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. 'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे,'' असे फडणवीस यांनी म्हटले आहे..Jal Yukta Shivar: सांगली जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ची ३६५० कामे पूर्ण.परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरे आणि त्यांनी सोबत येत 'नाम फाऊंडेशन'ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले..शेतकऱ्यांसाठी मदतीचा हातशेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे..'नटसम्राट' गमावला- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान आज हरपला असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणाऱ्या व प्रखर सामाजिक जाणिवा जपणाऱ्या नाना पाटेकर यांचे अकल्पित निधन हा चित्रपटसृष्टीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे. महाराष्ट्राने आणि देशाने एक संवेदनशील, तगडा अभिनेता व खऱ्या अर्थाने एक 'नटसम्राट' गमावला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान आज हरपला...नाना केवळ महान कलाकार नव्हते, तर ते महाराष्ट्राचा स्वाभिमान होते. 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे त्यांचे काम सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे, असे शिंदे यांनी नमूद केले..ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला अक्षरशः चटका लावणारी आहे. नाना पाटेकर यांचे दादांशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने झालेली पोकळी माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठीही विशेष दुःखद आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे..'दुष्काळाच्या परिस्थितीत चार- पाच दौरे करणार होते, पण...'''नाना… तो बुलंद आवाज निमूट शांत झाला. जाताना मनामनातील माणुसकीची संवेदना जिवंत ठेवून गेला...'' अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्यासमोर केवळ सिनेसृष्टी हा विषय नव्हता तर महाराष्ट्राच्या विकासात नाना पाटेकर यांची महत्त्वाची भूमिका राहिली. मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानासाठी तसेच संपूर्ण राज्यात पाणी या विषयावर त्यांनी काम केले. ते या महिन्यात दुष्काळाच्या परिस्थितीत माझ्यासोबत चार- पाच दौरे करणार होते. पण त्यांचे अचानक जाणे हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राला सहकार्य करणारे मोठे नेतृत्त्व आमच्यातून निघून गेले आहे. त्यांनी विशेषतः शेतकरी आणि शेतमजुरांच्या कल्याणासाठी काम केले. दुष्काळाच्या काळात त्यांची आम्हाला मोठी मदत होणार होती. पण फार मोठे नुकसान झाले आहे, असे बावनकुळे म्हणाले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.