Crop Damage
Crop DamageAgrowon

Drought Condition : अतिवृष्टी झालेल्या मंडळाची नावेही दुष्काळसदृश यादीत

Drought Update : अतिवृष्टी झालेल्या मंडळाची नावे देखील दुष्काळसदृश यादीत आल्याची शासनाची चूक माजी आमदार साहेबराव पाटील यांनी उघडकीस आणली आहे.
Published on

Jalgaon News : अतिवृष्टी झालेल्या मंडळाची नावे देखील दुष्काळसदृश यादीत आल्याची शासनाची चूक माजी आमदार साहेबराव पाटील यांनी उघडकीस आणली आहे. यादी दुरुस्त करून या मंडळांना अतिवृष्टीचे लाभ मिळावेत, अशी मागणीही माजी आमदार पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली आहे.

शासनाने पर्जन्याची तूट, उपलब्ध भूजल कमतरता, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पिकांची स्थिती पाहून राज्यातील १ हजार २१ मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. या यादीत पारोळा तालुक्यातील शेळावे, बहादरपूर, चोरवड या तीन मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.

Crop Damage
Drought Condition : संभाव्य दुष्काळावर उपाययोजना करा

माजी आमदार साहेबराव पाटील यांनी शासनाची यादी कशी चुकीची आहे, हे सिद्ध करण्यासाठी शासनाच्या व महावेधच्या पर्जन्यमानाचे आकडे सादर केले आहेत. पारोळा तालुक्यात शेळावे मंडळात जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरी ६१९.६ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना त्या मंडळात ६५९.४० मिमी म्हणजे १०६ .४२ टक्के पाऊस पडला आहे.

Crop Damage
Drought Condition : दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी सामाजिक संस्थांचा सहभाग हवा

या मंडळात ६ जुलै, ८ व २१ सप्टेंबर रोजी ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तसेच बहादरपूर मंडळात ६५९.३० मिमी म्हणजे १०५.११ टक्के पाऊस तर चोरवड मंडळात ६३२.९० मिमी म्हणजे १०२ टक्के पाऊस पडला आहे. या दोन्ही मंडळात देखील ७, ८ व २१ सप्टेंबरला ६५ मिमीपेक्षा जास्त म्हणजे अतिवृष्टी झाली आहे.

त्यामुळे शासनाच्या चुकीच्या आदेशात दुरुस्ती करून या तिन्ही मंडळांना दुष्काळसदृश परिस्थितीतून वगळून त्यांना शासन निर्णयानुसार अतिवृष्टीची मदत मिळावी. त्याचप्रमाणे २६ नोव्हेंबरच्या आकस्मिक पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीपिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर सरसकट तत्काळ मदत करावी, अशीही मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com