Nanded News : हवामान बदलामुळे अतिवृष्टी, ढगफुटीसदृश घटनात वाढ झाल्यामुळे शेतीक्षेत्रावर दूरगामी परिणाम होत आहेत. नांदेडमध्ये खरिपात ८६ टक्के क्षेत्रावर सोयाबीन आणि कपाशी या दोनच पिकांची लागवड केली जाते..ही पिके नैसर्गिक आपत्तीला बळी पडणारी आहेत. त्यामुळे रेशीम शेती, फळबाग लागवड, ऊस अशा अतिवृष्टीला प्रतिकारक पीक पद्धतीकडे वळण्यासाठी पिकांचे विविधीकरण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले..Climate Change Impact: समायोजन हवामान बदलाशी!.जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पेरणीसाठी नाम फाउंडेशन संस्थेने कृषी विभागाच्या समन्वयाने हरभरा पिकाचे ६०० क्विंटल बियाणे आणि ज्वारी पिकाचे १६० क्विंटल बियाणे मोफत वाटप केले आहे. रविवारी (ता. १९) जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते बियाणे वाटपाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. .या वेळी जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, नांदेड, शिवार हेल्पलाइन संस्थेचे विनायक हेगाणा, नाम फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके, नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक बालाजी कोंपलवार, दत्तात्रय गरजे, उपविभागीय दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, देगलूर उपविभागीय कृषी अधिकारी विठ्ठल गिते, नांदेड उपविभागीय कृषी अधिकारी अनिल शिरफुले, नांदेड तहसीलदार संजय वारकड, नांदेड तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, भाऊराव मोरे आदी उपस्थित होते. .Climate Change : शेतकऱ्यांना हवे असलेले तंत्रज्ञान, पीकवाण देण्याची गरज .जिल्हाधिकारी म्हणाले, की नैसर्गिक आपत्ती सौम्यकरणासाठी नांदेड जिल्ह्यात नदी-नाल्यांचे सरळीकरण आणि खोलीकरण, जलतारा, विहीर पुनर्भरण, रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी या उपयोजना करणे अत्यावश्यक आहेत. नाम फाउंडेशनच्या वतीने नदी-नाल्यांचे काठावर बांबूची लागवड करून काठांचे स्थिरीकरण आणि पुराचे पाणी नियंत्रण उपाय करीत आहे. .जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गटशेतीचा अवलंब करून मजुरी समस्येवर मात करावी तसेच नाम फाउंडेशन आणि शिवार हेल्पलाइन सारख्या अशासकीय संस्थांचा आदर्श समोर ठेवून इतर अशासकीय संस्थांनीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध उपाययोजनांद्वारे मदतीचा हात द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कर्डिले यांनी केले..नाम फाउंडेशनने ९५ लाखांचें बियाणे वाटपनाम फाउंडेशनने ९५ लाख रुपये किमतीचे ६०० क्विंटल हरभरा पिकाचे बियाणे, ज्वारी पिकाचे १६० क्विंटल बियाणे नांदेड जिल्ह्यास पुरवठा केले. या बियाण्याचे गाव पातळीवर कृषी विभागाच्या समन्वयाने नैसर्गिक आपत्तीने सर्वाधिक बाधित असलेल्या सहा हजार शेतकऱ्यांना वाटप करणार असल्याचे राजाभाऊ शेळके यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.