Employment Issue: समग्र शिक्षा योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या १२४ कर्मचाऱ्यांवर यंदा मोठे संकट ओढवले आहे. गेल्या आठ वर्षांपासून पगारवाढ न मिळालेल्या या कर्मचाऱ्यांना आता पुनर्नियुक्तीचे आदेशच न मिळाल्याने नोकरी गमावण्याची भीती निर्माण झाली आहे..दर वर्षीप्रमाणे या कर्मचाऱ्यांची नियुक्ती सहा महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात केली जात होती. या कालावधीनंतर एक महिन्याचा सेवाखंड देऊन पुन्हा पुनर्नियुक्ती देण्याची पद्धत होती. या वर्षी ३१ मार्च २०२६ रोजी त्यांची नियुक्ती संपली. त्यानंतर २ एप्रिलपासून पुनर्नियुक्ती अपेक्षित होती; मात्र केंद्र शासनाकडून कोणतेही आदेश न आल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. या निर्णयामुळे समग्र शिक्षा योजनेचे कामकाज विस्कळीत झाले आहे. .DA Hike: केंद्रीय कमर्चाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात २ टक्के वाढ, किती वाढेल पगार?.शिक्षण व्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम होत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात या कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमुळे कामकाज ठप्प होण्याची भीती आहे..Chana MSP Procurement Centers: सोलापूर जिल्ह्यात केवळ बार्शीतच हमीभाव खरेदी केंद्र सुरू.विशेष म्हणजे, गेल्या २५ वर्षांपासून ही योजना शिक्षण क्षेत्राचा कणा मानली जाते. तरीही या योजनेतील कर्मचाऱ्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत आहे. आठ वर्षांपासून पगारवाढ न मिळाल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांवर आता बेरोजगारीचे संकट कोसळले आहे..नियमित होण्याच्या आशेवर २५ वर्षे काढलेजिल्ह्यातील १२४ कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठ अभियंते, कार्यक्रम अधिकारी, संगणक प्रोग्रामर, एमआयएस समन्वयक, लेखा लिपिक, संशोधन सहाय्यक, विषय तज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर यांचा समावेश आहे. हे कर्मचारी नियमित होण्याच्या अपेक्षेने गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना नियमित करण्यात आले नाही. मात्र, आता त्यांच्या नोकरीवरच गंडांतर आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.