Nagpur News: नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत शासनाने अतिरिक्त १० हजार क्विंटल धान खरेदीस परवानगी दिली आहे. मात्र ही खरेदी केवळ उमरेड उपविभागात करण्यात येणार असल्याने रामटेक, मौदा, कामठी आदी धान उत्पादक तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे..चालू हंगामात जिल्ह्यात धान खरेदीसाठी सुरुवातीला १ लाख क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर ८ जानेवारीपासून धान खरेदी बंद करण्यात आली. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान खरेदीअभावी अडकून पडले होते. शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत असल्याने शासनाने अतिरिक्त १० हजार क्विंटल धान खरेदीस मंजुरी दिली. मात्र ही खरेदी उमरेड, भिवापूर आणि कुही या तीन तालुक्यांपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील धान लागवड व उत्पादनाचे मोठे क्षेत्र रामटेक व मौदा तालुक्यांमध्ये असतानाही या तालुक्यांचा खरेदी प्रक्रियेत समावेश करण्यात आलेला नाही. .Paddy Procurement Centre: आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्राचे वणीत उद्घाटन.यंदाच्या खरीप हंगामात नागपूर जिल्ह्यात सुमारे ९६ हजार ७१८ हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड झाली होती. त्यापैकी रामटेक तालुक्यात सुमारे २२ हजार ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर धान लागवड झाली आहे. त्याखालोखाल मौदा व कामठी तालुक्यांतही मोठ्या प्रमाणावर धानाचे उत्पादन घेतले जाते. .Paddy Procurement: धान खरेदीची मर्यादा संपल्याने ५० हजार शेतकरी अडचणीत.मात्र अतिरिक्त खरेदीत या तालुक्यांना वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. जिल्ह्यात पनन विभाग आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून २७ धान खरेदी केंद्रांवर खरेदी सुरू करण्यात आली होती. या केंद्रांवरून २९ फेब्रुवारीपर्यंत खरेदी प्रक्रिया सुरू होती. मात्र उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर खरेदी थांबविण्यात आली. .त्यामुळे अनेक उत्पादकांचे धान विक्रीअभावी शिल्लक राहिले. दरम्यान, अतिरिक्त खरेदीसाठी परवानगी देताना शासनाने उमरेड उपविभागातील तीन तालुक्यांपुरतीच मर्यादा ठेवली आहे. त्यामुळे रामटेक व मौदा तालुक्यांतील धान उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नसल्याची स्थिती आहे..धान उत्पादक संघटनांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक तालुक्यांना अतिरिक्त खरेदीचा लाभ द्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.