Nagpur News : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी यंदा एकूण ९१ हजार २५ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, मोहरी, जवस व इतर पिकांचा समावेश आहे. .संततधार पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. त्याची भरपाई रब्बी हंगामातून होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. त्यामुळेच रब्बी हंगामाच्या व्यवस्थापनात शेतकरी गुंतले आहेत. .Rabi Season: रब्बी हंगामासाठी पाऊस लाभदायक.त्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीपेक्षा या वर्षी बियाण्यांची मागणी जवळपास ८ ते १० टक्क्यांनी वाढली आहे. यंदा झालेला चांगला पाऊस, ओलिताची उपलब्धता आणि रब्बी पिकांच्या वाढलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचा कल या हंगामात वाढला आहे. .हंगामात मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी सार्वजनिक, खासगी तसेच महाबीज मार्फत बियाण्यांचा पुरवठा केला जाणार आहे. यात सार्वजनिक (शेतकऱ्याकडे असलेले बियाणे) २५ हजार २८३ क्विंटल, खासगी विविध कंपन्यांकडून पुरवठा केले जाणारे २८ हजार २८२ क्विंटल तर ‘महाबीज’कडून २७ हजार ४६० क्विंटल बियाणे लागणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागाने नियोजन पूर्ण केले आहे. शिवाय खतांचा स्टॉकही उपलब्ध करून देण्यात आला आहे..Rabi Season : यंदा हरभरा, गहू पिकाचे लागवड क्षेत्र वाढणार .पेरणीपूर्व तयारीला गतीसध्या राज्यभरातील शेतकरी नांगरणी, पेरणीपूर्व तयारी आणि खत साठवणीचे काम सुरू करत आहेत. अनेक ठिकाणी गव्हाच्या पेरणीस सुरुवात झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हरभरा पेरणी होण्याची शक्यता आहे..पीकनिहाय अंदाजित बियाण्यांची गरज (क्विंटलमध्ये)गहू : ५०,११५.२हरभरा : ४०,४८०ज्वारी (रब्बी) : २.४२इतर गळीत धान्य : २३६.२५मोहरी ः ५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.