Flood Relief: नागपूर विभागात २०२५-२६ मध्ये अतिवृष्टी, पूरस्थिती आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक व शेतजमिनीच्या नुकसानीपोटी ८ लाख ८३ हजार ९६५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ७१३ कोटी ९५ लाख ७२ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त विजया लक्ष्मी बिदरी यांनी दिली..नागपूर विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या ९ लाख ९५ हजार ५२३ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी ७९६ कोटी ७१ लाख ५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी आतापर्यंत ८.८४ लाख प्रकरणांमध्ये ७१३.९६ कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे. उर्वरित पात्र प्रकरणांमध्ये निधी वितरणाची प्रक्रिया संबंधित जिल्हा प्रशासनामार्फत प्राधान्याने सुरू असून, लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच मदतीची रक्कम जमा केली जाणार असल्याचे बिदरी यांनी स्पष्ट केले..Crop Damage Compensation: एप्रिलमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी ११ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत, १४ कोटी ५८ लाख निधी मंजूर.विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये मदत वितरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली आहे. त्यामध्ये वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ५४ हजार ५०० प्रकरणांना मंजुरी मिळाली असून २२४.८३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख २० हजार ६६८ प्रकरणांसाठी १३३.७४ कोटी, नागपूरमध्ये १ लाख ३१ हजार २६७ प्रकरणांसाठी १२४.५८ कोटी, गोंदियात १ लाख ४८ हजार ८८२ प्रकरणांसाठी ८८.५२ कोटी, भंडाऱ्यात १ लाख ४१ हजार ५७१ प्रकरणांसाठी ८४.१२ कोटी, तर गडचिरोलीत ९८ हजार ६१५ प्रकरणांसाठी ५८.१५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत..Farmer Compensation: अवकाळीच्या नुकसानीपोटी ३३४ कोटी निधी मंजूर.दरम्यान, विभागात अद्याप १ लाख ११ हजार २४९ प्रकरणे प्रलंबित असून त्यामध्ये चंद्रपूरमध्ये २९,९१८, गडचिरोलीत २०,२११, वर्ध्यात १९,०७३, नागपूरमध्ये १५,९८०, भंडाऱ्यात १४,९७२ आणि गोंदियात ११,०९५ प्रकरणांचा समावेश आहे..या सर्व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे विभागीय आयुक्त विजया लक्ष्मी बिदरी यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.