Additional Collector Office : नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाहीचा अपर जिल्हा कार्यालयाला विरोध

chimur Taluka : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे.
mahsul department
mahsul department

Chandrapur news : चिमूर येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयास नागभीड, ब्रह्मपुरी आणि सिंदेवाही तालुक्यांचा विरोध आहे. या तिन्ही तालुक्यांतील जिल्हा मागणी संघर्ष समितीची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. अपर जिल्हाधिकारी कार्यालयास विरोध म्हणून बुधवारी (ता. २) घोडाझरी तलावात अर्ध जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला आहे.

बैठकीला सिंदेवाही, ब्रह्मपुरी आणि नागभीड येथील समितीचे संयोजक उपस्थित होते. यात सर्वांनुमते चिमूर अपर जिल्हाधिकारी कार्यालय क्षेत्रात

mahsul department
Chandrapur Water Issue : चंद्रपूर जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टर क्षेत्र तहानलेले

जनतेची कुठल्याही हरकती न घेता समावेश केल्याबद्दल सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच सर्वांनुमते येत्या दोन ऑगस्ट रोजी घोडाझरी तलावात अर्ध जलसमाधी आंदोलन करण्याच्या निर्णय घेण्यात आला. २०१९ रोजी चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची घोषणा करण्यात आली. तेव्हा जिल्हा प्रशासनाने हरकती मागविल्या होत्या. त्याचा अहवाल शासनाला पाठविला होता. मात्र त्या अहवालावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यानंतर सरकारने ब्रह्मपुरी येथे अपर जिल्हा कार्यालय स्थापन करण्याचे पत्र काढले होते. मात्र पुढे त्याचे काहीच झाले नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी येथे सात्यत्याने जिल्हा मागणीसाठी आंदोलन केली जात आहेत. मात्र असे असताना शासनाने तिन्ही तालुक्यांतील जनतेचा कुठलाही विचार न करता १३ जून रोजी अपर येथे अपर जिल्हा कार्यालय निर्मिती करण्याची घोषणा केली. नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही तालुक्यांतील लोकांसाठी चिमूर हे सोयीचे ठिकाण नसल्याने त्याला विरोध म्हणून अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र त्याचीही दखल आजवर घेण्यात आली नाही. त्यामुळे तिन्ही तालुक्यांतील नागरिकांनी संताप व्यक्त केला. सरकारच्या या कृतीचा निषेध म्हणून घोडाझरी तलावात अर्ध जलसमाधी आंदोलन करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com