Temperature Control: मुंबईतील तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत असून, कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याचा फटका प्राणी-पक्ष्यांनाही बसत आहे. अशा परिस्थितीत राणी बागेत (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय) प्राण्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे..वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील जीवशास्त्रज्ञ अभिषेक साटम यांनी सांगितले, की प्राण्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पावले उचलली आहेत. .Animal Crop Damage Issues: मोकाट जनावरांचा धसई परिसरात उच्छाद.या उपाययोजनांमध्ये प्रामुख्याने, प्राण्यांच्या पिंजऱ्यांमध्ये थंड हवा खेळती राहावी म्हणून कुलर्स आणि पाण्याचे फवारे लावण्यात आले आहेत. .Winter Animal Diet: थंडीमध्ये दुधाळ जनावरांच्या आहारात काय बदल करावे?.प्राण्यांना पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. गरजेनुसार पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स किंवा ग्लुकोजचे द्रावण मिसळले जात आहे, जेणेकरून त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहील..वाढत्या उष्णतेचा विचार करून प्राण्यांच्या आहारातही बदल करण्यात आला आहे. त्यांना पचायला हलका आणि थंड आहार दिला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.