Manohar Joshi : मनोहर जोशींची प्रकृती खालावली; ठाकरे दाम्पत्यांकडून विचारपूस

Manohar Joshi Health Update : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या हिंदुजा हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Manohar Joshi
Manohar Joshi agrowon

Manohar Joshi Health News : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठे नेते मनोहर जोशी यांची काल रात्री अचानक प्रकृती खालावली आहे. त्यांना तातडीने मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.

Manohar Joshi
Fertilizer Subsidy : सरकार खतांवर अनुदान नेमकं कुणासाठी देतं?; शेतकऱ्यांसाठी की खत कंपन्यांसाठी?

मनोहर जोशी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. मेंदूशी संबंधित व्याधीवर ते उपचार घेत आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणातून बाजूला होते. काल रात्री मनोहर जोशींना अचानक अस्वस्थ वाटू लागलं, म्हणून त्यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज सकाळी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे यांनी रूग्णालयात जाऊन प्रकृतीची विचारपूस केली. मनोहर जोंशीवर डॉक्टर चारूलता संकला यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्ती होते. शिवसेनेतील पहिल्या फळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. महाराष्ट्रात सन १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसेच केंद्रात एनडीएचे सरकार असताना त्यांनी लोकसभेचे अध्यक्षपदी भूषावले आहे.

मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाल्यानंतर हळूहळू बाजूला पडले. तसेच पक्ष संघटनेतूनही त्याना डावलण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा चर्चेत आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com