Mumbai Market Committee : सात महिन्यांनंतर मुंबई बाजार समितीची शुक्रवारी बैठक

Navi Mumbai Apmc Market Update : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालकांचे स्थानिक बाजार समित्यांतील संचालकपदाचा कालावधी संपल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते.
Mumbai Market Committee
Mumbai Market CommitteeAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : गेल्या सात महिन्यांपासून रखडलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक मंडळाची बैठक अखेर ३० जून रोजी बोलविण्यात आली आहे. मात्र, ही सभा होऊ नये यासाठी एका माजी संचालकाने पत्र दिले असून, अध्यक्ष अशोक डक यांनी राजीनामा दिल्याने ही सभा होऊ शकत नाही, असा दावा केला आहे.

Mumbai Market Committee
Mumbai APMC News : मुंबई बाजार समिती बरखास्तीच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नाला सुरुंग

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालकांचे स्थानिक बाजार समित्यांतील संचालकपदाचा कालावधी संपल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते. तत्पूर्वी जानेवारीमध्ये झालेल्या संचालक मंडळांच्या बैठकीत अशोक डक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी राजीनामा दिला होता.

नवीन निवडीसाठी सभा बोलविणे अपेक्षित असताना संचालकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. त्यामुळे बैठक कुणाच्या अध्यक्षतेखाली घ्यायची असा पेच होता. संचालकांनी अपात्रतेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

तरीही काहीही करून बाजार समितीवर प्रशासक नियुक्ती करण्याचा घाट घालत प्रशासनाला हाताशी धरून अनेक उपद्व्याप सरकारी पातळीवरून करण्यात आले. संचालकांच्या अपात्रतेला दिलासा दिल्यानंतर पणन संचालकांनी कोरमची संख्या ५० टक्क्यांवर नेली.

त्यामुळे कोरमअभावी अन्य संचालकांनाही अपात्र करून त्यांना नोटिसा पाठविल्या. या संचालकांनी उच्च न्यायलयात धाव घेतल्यानंतर शासन प्रतिनिधी असलेल्या पाच संचालकांची नियुक्ती का केली नाही, असा सवाल राज्य सरकारला केला.

अध्यक्ष, उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर बैठक बोलविणे बेकायदेशीर आहे, अशी तक्रार एका माजी संचालकाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. संचालकांना कोर्टाने दिलासा दिल्याने कोरम पूर्ण होत असल्याने बैठक वैध ठरते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com