MSP Support: केंद्र सरकारने उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये कडधान्ये आणि तेलबियांच्या हमीभाव खरेदीसाठी मंजुरी दिली आहे. या तिन्ही राज्यांमधून ५.२१ लाख टन कडधान्ये आणि १.९० लाख टन तेलबिया पिकांच्या हमीभाव खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. खरीप हंगामातील पिकांची आवक बाजारात सुरू होऊ लागली आहे. मात्र कमी पावसामुळे उत्पादनाला मोठा फटका बसला आहे..केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत (पीएसएस) ही खरेदी केली जाणार आहे. खुल्या बाजारात पिकांचे दर हमीभावापेक्षा खाली गेल्यावर केंद्राच्या नोडल एजन्सी नाफेड आणि एनसीसीएफमार्फत कडधान्ये आणि तेलबियांची खरेदी केली जाते. यंदा मात्र केंद्र सरकारने या संस्थांना राज्य सरकारच्या मागणीची प्रतीक्षा न करता खरेदी सुरू करण्याची परवानगी दिली आहे..MSP Procurement 2026-27: केंद्र सरकारने तीन राज्यांतून कडधान्य आणि तेलबिया पिकांच्या हमीभाव खरेदीला दिली मंजुरी.केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये कडधान्ये आणि तेलबियांची ५,५४७.९९ कोटी रुपयांची हमीभाव खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती कृषी मंत्रालयाने दिली..उत्तर प्रदेशात तूर, मूग खरेदीउत्तर प्रदेशात ३,९९२.५७ कोटी रुपयांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ४.६६ लाख टन तूर आणि ६ हजार २५० टन मूग खरेदी केला जाणार आहे. तुरीसाठी ३,९३७.७० कोटी रुपये, तर मुगासाठी ५४.८७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत..कर्नाटकात सोयाबीन, मूग आणि सूर्यफूल खरेदीकर्नाटकमध्ये १,१०७ कोटी रुपयांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये १ लाख १५ हजार ५०० टन सोयाबीन, ३८ हजार २५० टन मूग आणि १३ हजार ४१३ टन सूर्यफूल खरेदी केले जाणार आहे. यासाठी अनुक्रमे ६५९.२७ कोटी, ३३५.८३ कोटी आणि १११.९० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत..Indian Cotton Farmers Challenges: भारतातील कापूसकोंडी कशी सुटेल?.तेलंगणात सोयाबीन,मूग खरेदीतेलंगणात ४४८.४२ कोटी रुपयांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ६२ हजार टन सोयाबीन आणि १० हजार ७६६ टन मूग खरेदी केला जाणार आहे. यासाठी सोयाबीनला ३५३.९० कोटी रुपये, तर मुगासाठी ९४.५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत..खुल्या बाजारात भाव घसरल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि त्यांच्या उत्पादनाला किफायतशीर भाव मिळावा, हा या निर्णयाचा उद्देश आहे. विशेषतः कडधान्ये आणि तेलबिया उत्पादकांना याचा फायदा होणार आहे, असा दावा केंद्रीय कृषी मंत्रालयाने केला आहे..या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळण्यासोबतच देशांतर्गत कडधान्ये आणि तेलबियांचे उत्पादन वाढण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच डाळी आणि खाद्यतेलाच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्नांना हातभार लागेल, असे सरकारने म्हटले आहे. खरेदी केंद्रांवर पारदर्शक व्यवस्था ठेवण्यात येईल आणि शेतकऱ्यांना खरेदीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, अशी ग्वाहीही सरकारकडून देण्यात आली आहे..दरम्यान, महाराष्ट्रात यंदा बहुतांश भागात दुष्काळाची स्थिती आहे. खरीप पिकांना कमी पावसाचा मोठा फटका बसल्याने उत्पादकता घटली आहे. काही भागांत पिकांची काढणी सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील काळात हळूहळू बाजारात आवक सुरू होईल. त्यापूर्वी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.