MPKV signs MoU with AFARM : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पुण्यातील ‘अफार्म’ संस्था यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. शाश्वत ग्रामीण उपजीविका आणि हवामान-अनुकूल कृषी तंत्रज्ञानावरील सहकार्य अधिक दृढ व व्यापक करण्याच्या हेतूने हा करार झाल्याचे दोन्हीही संस्थांच्या वतीने सांगण्यात आले. .महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि ‘अफार्म’चे अध्यक्ष डॉ. व्यंकट मायंदे यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डाॅ. प्रशांत बोडके, ‘अफार्म’चे कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी यावेळी उपस्थित होते..MoU For Smart Farming: महात्मा फुले कृषी विद्यापीठ,बायफ संस्थेत संशोधनासाठी करार.सातत्याने बदलत्या हवामान परिस्थितीत ग्रामीण उपजीविकेतील उदयोन्मुख आव्हानांना सामोरे जाण्यासाठी वैज्ञानिक संशोधन, क्षेत्रीय अंमलबजावणी आणि ज्ञान-प्रसार यांचे एकत्रीकरण करण्यासाठी हा करार झाला असून संशोधन, विस्तार, प्रशिक्षण आणि ज्ञान आदान-प्रदान या क्षेत्रांसाठी विशेष आराखडा तयार करण्यात येईल. .India Fiji agricultural MoU : शेती क्षेत्रात भारत–फिजी सहकार्य वाढवणार; सामंजस्य करारावर चर्चा.या करारासंदर्भात माहिती देताना डॉ. मायंदे म्हणाले, “यामुळे वैज्ञानिक नवकल्पना ग्रामीण समुदायांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतील. तसेच संयुक्त पथदर्शी उपक्रम आणि क्षेत्रीय चाचण्या, व्यापक प्रसारासाठी मॉडेल्सचा विकास आणि ‘अफार्म’च्या ग्रामीण उपजीविका शिखर परिषद २०२६ नंतरच्या कृती कार्यक्रमाद्वारे यात सर्वांचा सहभाग वाढवण्यास मदत होईल.”.कराराचे होणारे फायदे हवामान-अनुकूल आणि शाश्वत कृषी पद्धतींचा विकास आणि प्रसार विशिष्ट ठिकाण आणि पिकासाठी आवश्यक असणाऱ्या हवामानावर आधारित कृषी-सल्ला मार्गदर्शन सेवा अचूक निर्णयासाठी परिस्थितीसदृश हवामान अनुकूल सुधारित पीक-आराखडा निर्मिती नावीन्यपूर्ण उपजीविका मॉडेलचे संयुक्तपणे कृती-संशोधन आणि क्षेत्रीय पडताळणी शेतकरी आणि हितधारकांची अनुकूलन क्षमता वाढवण्यासाठी क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण कृषी-वैज्ञानिक संस्था आणि तळागाळातील तंत्रज्ञ व कृषी प्रसारक यांचा संबंध दृढ करणे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.