Sakal News : ‘सकाळ’ माध्यम समूह व ‘ॲग्रोवन’ संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था ‘एसआयआयएलसी’ आणि देशातील नामांकित कंपनी भारत विकास ग्रुप इंडिया लि. (बीव्हीजी इंडिया) यांच्यात देशातील पहिला इंडस्ट्री संलग्न अन्न प्रक्रिया उद्योजकता विकास हा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम सातारा मेगा फूड पार्क येथे राबविण्यासंदर्भात सामंजस्य करार झाला.
या करारावर बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हनुमंतराव गायकवाड व ‘सकाळ एसआयआयएलसी’चे कृषी विभाग प्रमुख व सहसरव्यस्थापक अमोल बिरारी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
याप्रसंगी ‘बीव्हीजी’च्या संचालिका वैशाली गायकवाड, ॲप्रेंटिसशिप विभाग प्रमुख रवी घाटे, बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगचे संचालक पी. एन. जुमले, उपसंचालक एन. एन. वडोडे व ‘एसआयआयएलसी’चे वरिष्ठ व्यवस्थापक अमित मांजरे आदी उपस्थित होते.
६० एकरांवरील सातारा मेगा फूड पार्कमध्ये अन्नप्रक्रिया निवासी प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना इंडस्ट्रीत अन्न पदार्थांची प्रक्रिया कशा प्रकारे केली जाते, कोणती मशिन कशी काम करते, प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी, प्रक्रिया उत्पादनांची शीतगृहात साठवण करणे, पॅकिंग, ब्रॅण्डिंग आदी सर्व गोष्टी जवळून अभ्यासण्याची संधी असणार आहे.
प्रशिक्षणार्थींना इंडस्ट्री सुरू करण्यासाठी मार्गदर्शन तसेच मेगा फूड पार्कमधील यंत्रणा भाडेतत्त्वावर देण्याचे तसेच चांगल्या प्रकल्पासाठी अर्थसाह्य व हॅन्ड होल्डिंगचेही साह्य केले जाणार आहे. मेगा फूड पार्कचे उपाध्यक्ष विजयकुमार चोले मार्गदर्शन करणार आहेत. माहितीसाठी संपर्क : ८९५६३४४४७२.
जागतिक स्तरावर भारतीय युवकांना मुबलक संधी
हनुमंतराव गायकवाड यांनी सांगितले, की केंद्र सरकारने जागतिक स्तरावर भारतीय युवकांना प्लेसमेंट देण्यासंदर्भात बीव्हीजी इंडियासमवेत सामंजस्य करार केला आहे. जपान, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका आदी देशांत कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. दोन ते अडीच लाख भारतीय युवकांना या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न देणारे रोजगार उपलब्ध होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी आवश्यक ते प्रशिक्षण घेऊन आपले कौशल्य वाढविण्यावर भर द्यावा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.