के. एच. शिरगापुरे, एस. बी. बडेशेवगा पानांमधील गुणधर्मांचा दीर्घकाळ फायदा घेण्यासाठी पाने वाळवून त्यापासून भुकटी केली जाते. त्याची साठवण, पॅकिंग करण्याबरोबर प्रत्यक्ष वापरही सोपा जातो. अगदी लहान शेतकरीही छोट्या प्रमाणात प्रक्रिया उद्योग उभा करू शकतो. मात्र शेंगांपेक्षा पानांवर लक्ष केंद्रित करून त्यांचे उत्पादन अधिक घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नियमित पण मर्यादित प्रमाणात पाणी व्यवस्थापन करत दर काही कालावधीनंतर झाडांची छाटणी करून फांद्यांची व त्यावरील पानांची संख्या जास्तीत मिळवणे गरजेचे असते. .पानांच्या उत्पादनासाठी खास जातीMOLE : विशेषतः सघन लागवडीसाठी विकसित जात असून, अधिक कापण्या व भरपूर पाने मिळतात.PKM२ : बाजूच्या फांद्या अधिक निर्माण होत असल्याने पानांचे उत्पादन अधिक मिळते. आहे.PKM१ : पाने व शेंगांचेही अधिक उत्पादन देते..Shevaga Farming: दर्जेदार शेवगा उत्पादनासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर.Shevaga Farmingतेल काढण्यासाठी जातीODC३ आणि PKM१ : या जातींमध्ये प्रत्येक शेंगांमध्ये बियांची संख्या जास्त असून, त्यामुळे तेल काढण्यासाठी चांगली मानली जाते.जाफना : ही जात लांब शेंगाची असून, त्यातही बियांची संख्या अधिक मिळते..लागवडशेंगाबीज केंद्रित लागवड पद्धतविशेषतः तेल काढण्यासाठी अधिक बिया मिळवणे गरजेचे असते. ते लक्षात घेऊन शेवग्याच्या १.८ मीटर x १.८ मीटर अंतरावर लागवडीची शिफारस केली जाते. त्यामुळे एकरी अंदाजे १,२०० रोपे बसतात. या लागवड अंतरामुळे झाडाची पर्ण आच्छादन (कॅनोपी) विकसन, बागेत आतपर्यंत सूर्यप्रकाश प्रवेश आणि आंतरमशागत सुलभ होते..Soybean Rate: सोयाबीन दर कमीच; तसेच काय आहेत शेवगा, बीट, वांगी आणि सीताफळाचे आजचे बाजारभाव .पानांच्या उत्पादनासाठी सघन लागवडपानांच्या उत्पादनासाठी शेवग्याची ०.९ मीटर × ०.९ मीटर अंतरावर सघन लागवड करण्याची शिफारस आहे. त्यामुळे एकरी अंदाजे ५ हजार रोपे बसून पानांचे उत्पादन लक्षणीयरीत्या वाढते. कमी जागेत वनस्पतींचे आरोग्य आणि उत्पादकता राखण्यासाठी अचूक पोषक तत्त्वेआणि सिंचन व्यवस्थापन आवश्यक असते. ही पद्धत विशेषतः व्यावसायिक शेवगा पानांची पावडर उत्पादनासाठी योग्य आहे. या बागेमध्ये शेंगांच्या विकासापेक्षाकोवळी पाने व दांड्याची वारंवार कापणी केली जाते..झाडांना आकार देणेसामान्यतः शेवगा झाडास लांब फांद्या येऊन त्या उभ्या वाढतात. फक्त त्यांच्या टोकावर पाने आणि फळे येतात. त्यामुळे झाडांना नुसतेच नैसर्गिकरीत्या वाढू दिले तरी पानाचे व शेंगांचे उत्पादन कमी येते. झाड पहिल्या वर्षात सुमारे ३ ते ४ मीटर उंचीपर्यंत वाढू शकते. त्यानंतर सुमारे १०-१२ मीटरपर्यंत वाढू शकते. झाडे लहान असताना त्यांना चांगला आकार देणे आवश्यक आहे. त्याच्या बाजूच्या फांद्या वाढवून झाडांचे रूपांतर झुडपात करणे आवश्यक असते. जेव्हा झाड ५० सेंमी ते १ मीटर उंचीवर पोहोचते, तेव्हा मध्यवर्ती देठ टोकाच्या कळीपासून खुडावा. यामुळे बाजूने अनेक फांद्यांची वाढ होईल. त्यामुळे पानांचे व शेंगांचेही उत्पादन वाढते. यामध्ये झाडाची उंची कमी राहते. परिणामी, जोराच्या किंवा वादळी वाऱ्यामध्ये होणारे नुकसान टळते. कापणी सोपी होते..सिंचन व खत व्यवस्थापनपेरणीनंतर पहिल्या ३ महिन्यांत नियमितपणे पाणी दिले पाहिजे. शक्यतो ठिबक सिंचन प्रणाली वापरावी. पेरणीपूर्वी हेक्टरी १० टन शेण खत वापरावे. दरवर्षी प्रति हेक्टर अंदाजे १५० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. पेरणीपूर्वी स्फुरद आणि पालाशच्या पूर्ण मात्रा व एकूण नत्रांपैकी ३० किलो नत्र द्यावे. दुसरी मात्रा लागवडीनंतर सुमारे ४५ दिवसांनी द्यावी. त्यानंतर पुढील नत्र प्रत्येक कापणीनंतर विभागून द्यावे. त्यामुळे पानांचे उत्पादन वेगाने होते. पानांचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी विद्राव्य खते ५ ते ६ समान टप्प्यात फर्टिगेशनद्वारे द्यावीत.के. एच. शिरगापुरे ९५४५६९५१४१सहायक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.