Vidhansabha Election Amravati : अमरावती जिल्ह्यात वाढले एक लाखांवर मतदार

Vidhansabha Election 2024 : आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू; प्रशासनाच्या मोहिमेचा परिणाम
पुणे जिल्ह्यात लोकसभेसाठी दहा लाख मतदार वाढले
पुणे जिल्ह्यात लोकसभेसाठी दहा लाख मतदार वाढले
Published on
Updated on

Amravati News : अमरावती ः विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत जवळपास एक लाख मतदारांची भर आठही मतदारसंघांत पडली आहे. सर्वाधिक २५ हजार ९२६ मतदारांची वाढ अमरावती मतदारसंघात झाली असून त्या खालोखाल २३ हजार ४२ मतदार बडनेरा मतदारसंघात वाढले आहेत. ४ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मतदार जागृती अभियानानंतर मतदारांच्या संख्येत एक लाखांनी भर पडली आहे.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक मतदानकेंद्रांवर गर्दीमुळे गोंधळ उडाला होता. ते पाहता यंदा जिल्ह्यात २६ नवे मतदानकेंद्र राहणार आहेत. त्यापैकी २३ अमरावती शहरात, तर तीन केंद्र मेळघाटात राहणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी बुधवारी (ता. १६) सांगितले. आचारसंहितेनंतर करावयाच्या कामांबाबत पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी मंगळवारी (ता. १५) प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

पुणे जिल्ह्यात लोकसभेसाठी दहा लाख मतदार वाढले
Amravati MLC Election: अमरावती पदवीधर मतदार संघात चुरस वाढली

लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या तांत्रिक चुका यावेळी सुधारण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांचे मतदान घरी जाऊन केले जाईल. तसेच निवडणूक कामातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टपाल मतपत्रिकांचा पुन्हा गोंधळ होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत अनेक कर्मचाऱ्यांना टपाल मतपत्रिकाच न मिळाल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते.

विशेष म्हणजे ज्या मतदारांचे नाव अद्यापही यादीत नसेल त्यांना त्यांचे नाव टाकात येणार आहे, तसेच चुकीचे नाव असल्यास त्यामध्ये बदलसुद्धा करता येणार आहे. २० नोव्हेंबरपर्यंत मतदारांना आपली नावे टाकता येतील तसेच आपले नाव यादीत आहे की नाही, हे तपासता येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com